अर्थ मंत्रालयाने १२ डिसेंबर २०१९ रोजी राष्ट्रीय बचत दिर्घकालीन मुदत ठेव योजना २०१९ ची (National Savings Time Deposit Scheme 2019) म्हणजेच टीडी (टाइम डिपॉझीट) योजनेची अधिसूचना जारी केली. सध्या यी योजनेची बरीच चर्चा आहे. जाणून घेऊयात याच योजनेबद्दल…

  • या नवीन योजनेनुसार चार प्रकारच्या मुदत ठेवी (एफडी) योजनांचा गुंतवणुकदारांना लाभ घेता येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत गुंतवणूक एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्षांसाठी करण्याचे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
    दिर्घकालीन ठेवीच्या या नवीन योजनेचे खाते कोणत्याही व्यक्ती सुरु करता येणार आहे. त्याचप्रमाणे तीन व्यक्तींना संयुक्तरित्या एकाच खात्याच्या माध्यमातून गुंतवणूक करायची असल्याचे असा पर्यायी या योजनेअंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
  • १० वर्षांहून कमी वयाच्या मुलांच्या नावाने पालक या योजनेमध्ये गुंतवणूक करु शकतात.
  • एका व्यक्तीला एकाहून अधिक खाती सुरु करता येतील. मात्र त्याला ही सर्व खाती संलग्न करणे बंधनकारक असणार आहे. दिर्घकालीन मुदत ठेवीच्या या खात्यामध्ये किमान एक हजार तर जास्तीत जास्त कितीही पैसे गुंतवता येतील.

असे असतील व्याजदर

  • दिर्घकालीन मुदत ठेवींवर व्याजदर हे गुंतवणुकीच्या कालावधीनुसार वेगवेगळे असणार आहेत. एक वर्ष, दोन वर्ष आणि तीन वर्षांच्या गुंतवणुकीसाठी समान व्याजदर ठेवण्यात आला आहे. तीन वर्ष ६.९ टक्के दराने व्याज मिळेल. तर पाच वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास जास्त फायदा मिळणार आहे. पाच वर्षांच्या गुंतवणुकीवर ७.७ टक्के व्याज गुंतवणूकदारांना मिळणार आहे.

म्हणजेच वरील तक्त्यानुसार एक लाख रुपये पाच वर्षांसाठी गुंतवल्यास ७९९५*५ = ३९,६२५ रुपये व्याज गुंतवणुकदारास मिळेल.

दिर्घकालीन मुदत ठेवींच्या या चारही योजनांचे व्याज त्रैमासिक पद्धतीने मिळणार आहे. खाते सुरु केल्यानंतर एका वर्षांनी व्याजाची रक्कम ग्राहकांना आपल्या खात्यावर जमा करता येणार आहे. दिर्घकालीन मुदत ठेवी योजनेअंतर्गत खाते सुरु करणाऱ्या ग्राहकांना व्याजाची रक्कम थेट आपल्या बचत खात्यावर जमा करता येईल.