News Flash

निफ्टी निर्देशांकाला नवे नामाभिधान

गत दोन दशकांत निफ्टी ५०चे बाजारमूल्य ५८.५ टक्क्य़ांनी वाढले आहे

राष्ट्रीय शेअर बाजाराचा दोन दशकांचा प्रवास
स्थापनेची दोन दशके पूर्ण केलेल्या देशातील सर्वात मोठय़ा भांडवली बाजाराने तिच्या प्रमुख निर्देशांकासाठी नव्या नावाचा साज चढविला आहे. ३ नोव्हेंबर १९९५ मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा सीएनएक्स निफ्टी निर्देशांक आता ‘निफ्टी ५०’ नावाने ओळखला जाईल.
एनएसईची समूह कंपनी असलेल्या ‘इंडिया इन्डेक्स सव्‍‌र्हिसेस अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्स लिमिटेड’ने सीएनएक्स निफ्टीसह विविध ५३ निर्देशांकांच्या नामाभिधानातही बदल करण्यात आला आहे.
कठोर देखरेखीतून विश्वासार्हता जपलेल्या राष्ट्रीय शेअर बाजारावर गुंतवणूकदार नामांतरानंतरही तेवढाच विश्वास दाखवतील, असा विश्वास बाजाराच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांनी व्यक्त केला आहे.
गत दोन दशकांत निफ्टी ५०चे बाजारमूल्य ५८.५ टक्क्य़ांनी वाढले आहे. तर १६ क्षेत्रामध्ये वित्तीय सेवा विभागाने ३१ टक्के परतावा दिला आहे.
या कालावधीत निफ्टी ५० या निर्देशांकाने ११ टक्के परतावा दिला आहे.
निफ्टी ५० ने २००९ मध्ये सर्वाधिक, ७५.८० टक्के परतावा दिला.
सीएनएक्स निफ्टी आता निफ्टी ५० नावाने ओळखला जाईल तर अन्य निर्देशांकांमधील सीएनएक्स ऐवजी निफ्टी हे नाव आधी येईल.
एकूण ५३ निर्देशांकांच्या नावांमध्ये बदल करण्यात आला आहे.
निफ्टी ५० मध्ये आयटी क्षेत्राचे भारमान सर्वाधिक १५.७ टक्के

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 3:19 am

Web Title: new name for nifty
टॅग : Nifty
Next Stories
1 खर्चावर कात्री चालणार नाही: अर्थमंत्र्यांची ग्वाही
2 आता आयुर्वेद दिनही साजरा होणार!
3 नव्या संवत्सराचा मुहूर्त सकारात्मक
Just Now!
X