News Flash

पायाभूत प्रकल्पांत जनसामान्यांची थेट गुंतवणूक अपेक्षित – गडकरी

खासगी बँकांच्या दावणीला बांधून त्यांचे त्यामध्ये विलीनीकरण केले जाऊ नये

शंभराव्या वर्धापन दिनानिमित्त सारस्वत बँकेने आपले पहिलेवहिले क्रेडिट कार्ड, गिफ्ट कार्ड व प्री-पेड कार्ड गुरुवारी प्रस्तुत केले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर.

बडय़ा पायाभूत विकासाच्या प्रकल्पांसाठी आपली केवळ विदेशी संस्था व गुंतवणूकदारावरच मदार का असावी, तर जनसामान्य आणि व्यावसायिकांना व्याज परताव्याची हमी पाहून अशा गुंतवणुकीला प्राधान्य देता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

सेवानिवृत्त नोकरदार, शिक्षक, पोलीस शिपाई असे सर्व जनसामान्य देशाच्या विकासात महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी आपल्या गुंतवणुकीने थेट योगदान देऊ शकतील. त्यांनी गुंतविलेला हा पैसा चांगल्या व्याज लाभासह परत केला जाईल, असा विश्वास गडकरी यांनी नागरी सहकारी बँकांतील अग्रणी सारस्वत बँकेच्या शतकमहोत्सवी वर्ष सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. असे झाले तर विदेशी गुंतवणुकीची आपल्याला गरजच पडणार नाही, अशी त्यांनी पुस्ती जोडली.

सहकार क्षेत्रातील बँकांचे मूळ स्वरूप जपले गेले पाहिजे. खासगी बँकांच्या दावणीला बांधून त्यांचे त्यामध्ये विलीनीकरण केले जाऊ नये, असे आपले रिझव्‍‌र्ह बँकेला आर्जव असल्याचे गडकरी यांनी सांगितले. या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही व्यासपीठावर हजर होते. रिझव्‍‌र्ह बँकेचे कार्यकारी संचालक सुदर्शन सेन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे हेही व्यासपीठावर होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 3:44 am

Web Title: public investment is expected in infrastructure projects says nitin gadkari
टॅग : Nitin Gadkari
Next Stories
1 बाजार उच्चांकाला असताना, बॅलन्स फंडात गुंतवणुकीकडे कल
2 बाजार तंत्रकल : ‘तेजीचं अंतिम पर्व’
3 यंदाच्या दिवाळी सुट्टीत देशांतर्गत पर्यटनात दोन अंकी दराने वाढ अपेक्षित
Just Now!
X