News Flash

रिझर्व्ह बॅँकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांची घट, गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता

भारतीय रिझर्व्ह बॅँकेने गुरूवारी सकाळी रेपो दरात पाव टक्क्यांची घट करण्यात आल्याचे जाहीर केले.

| January 15, 2015 09:28 am

भारतीय रिझर्व्ह बॅँकेने गुरूवारी सकाळी रेपो दरात पाव टक्क्यांची घट करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे यापूर्वी आठ टक्क्यांवर असणारा रेपो दर आता 7.75 इतका झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकार आणि उद्योगक्षेत्राकडून व्याजादरांमध्ये कपात करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या मागणीला एकप्रकारे अनुकूलता दर्शवित रिझर्व्ह बँकेने रेपो दरांमध्ये घट केली. रेपो दरांमध्ये झालेल्या या घसरणीचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर दिसण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे संपूर्ण दिवसभर शेअर बाजारातही सकारात्मक वातावरण पहायला मिळु शकते. आज सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने 570 अंकांची उसळी घेतली. रेपो दरातील कपातीमुळे गृहकर्जाचे व्याजदरही कमी होणार असल्याने सामान्य ग्राहकांच्यादृष्टीनेही हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 

सविस्तर वृत्त थोड्याचवेळात…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 9:28 am

Web Title: rbi slashes repo rate by 25 bps to 7 75 per cent with immediate effect
टॅग : Business News,Rbi
Next Stories
1 शेअर बाजारही आता उद्योगक्षेत्राच्या सामाजिकतेचा कस जोखणार!
2 काळे धन कारवाई ३१ मार्चपूर्वीच
3 ‘सीआरआर’च्या व्याप्तीचा प्रस्ताव रिझव्र्ह बँकेने फेटाळला!
Just Now!
X