27 September 2020

News Flash

‘महाजॉब्ज’वर नोंदणी करणाऱ्यांना आता कौशल्य विकास प्रशिक्षण

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

(संग्रहित छायाचित्र)

आतापर्यंत २.८६ लाखांकडून नोकरीसाठी नोंदणी

राज्यातील उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी उद्योग, कामगार विभागाच्यावतीने सुरू केलेल्या ‘महाजॉब्ज’ संकेतस्थळाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत दोन लाख ८६ हजार जणांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८,४०३ अकुशल नोकरीइच्छुक असून, त्यांना  प्रशिक्षणासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाकडे वर्ग केले जाणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी येथे दिली.

‘महाजॉब्स’ संकेतस्थळाचा आढावा घेण्यासाठी उद्योगमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. या वेळी उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नोकरी इच्छुकांना रोजगाराच्या उच्चतम शक्यता असणाऱ्या पणन अधिकारी, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, टूल ऑपरेटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, ऑफिस असिस्टंट व मनुष्यबळ विकास आदी क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित केले जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 12:21 am

Web Title: skill development training now for those who register for mahajobs abn 97
Next Stories
1 अन्नधान्य महागाईत चढ सुरूच!
2 ‘स्मॉल-कॅप’ना सुदिन!
3 उद्यमशील, उद्य‘मी’ : चिरंजीवी भव!
Just Now!
X