करोनामुळे उद्भवलेल्या टाळेबंदीचा मोठा फटका वाहन कंपन्यांना नव्या वित्त वर्षांच्या आरंभीच बसला आहे. देशातील आघाडीच्या मारुती सुझुकी, ह्य़ुंदाई मोटरसारख्या कंपन्यांनी गेल्या महिन्यात शून्य टक्के वाहन विक्री नोंदविली आहे.

मार्च मध्यापासून लागू झालेल्या टाळेबंदीमुळे वाहन कंपन्यांनी निर्मिती बंद ठेवली होती. तसेच त्यांची विक्री दालनेही बंद होती. काही कंपन्यांनी तंत्रस्नेही मंचावर वाहन विक्री नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र त्याचा ग्राहक मिळविण्याबाबत फारसा परिणाम झाला नाही.

देशातील अग्रणी मारुती सुझुकीने एप्रिलमध्ये एकही वाहन विकले नाहीत. टाळेबंदीमुळे कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत एकही वाहन विकले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. गेल्या संपूर्ण महिन्यात कंपनीचे सर्व निर्मिती प्रकल्प बंद ठेवावे लागले होते, असेही नमूद करण्यात आले. टाळेबंदी कालावधीत बंदर क्षेत्रातील हालचाली शिथील करण्यात आल्यामुळे कंपनीने एप्रिलमध्ये ६३२ वाहनांची निर्यात केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ह्य़ुंदाई मोटर इंडियानेही गेल्या महिन्यात एकही वाहन विकले नाही. मात्र कंपनीच्या १,३४१ वाहनांची निर्यात विदेशात झाली. त्याचबरोबर महिंद्र अँड महिंद्र, टोयोटा किलरेस्कर नवागत एमजी मोटर इंडियाची गेल्या महिन्यात वाहन विक्री झाली नाही.