अल्केम लॅबॉरेटरीजकडून समभागांची प्रत्येकी १०५० रुपये किंमत निश्चिती

प्रत्येकी १०२० रु. ते १०५० या किमतीला झालेल्या या भागविक्रीचा ४४.३ पटीने भरणा पूर्ण झाला होता.

गेल्या सप्ताहात यशस्वी प्रारंभिक भागविक्री पूर्ण करणाऱ्या अल्केम लॅबॉरेटरीजने प्रत्येकी १०५० रुपये अशी समभागांची वितरण किंमत निश्चित केली आहे. प्रत्येकी १०२० रु. ते १०५० या किमतीला झालेल्या या भागविक्रीचा ४४.३ पटीने भरणा पूर्ण झाला होता. देशातील सर्वाधिक वेगाने प्रगती करीत असलेली तिसरी मोठी औषधी कंपनी असलेल्या अल्केमच्या समभागांची येत्या २९ डिसेंबरला अथवा त्यापूर्वी शेअर बाजारात सूचिबद्धता होणे अपेक्षित आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Alkem laboratory fixing the price of shares of rs 1050 each