गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे झालेले नुकसान हे महागाई वाढण्यास कारणीभूत ठरू शकत असले तरी यंदा मोसमी पाऊस चांगला झाल्यास येत्या ऑगस्टमध्ये महागाईचा दर ४ टक्क्यांवर ठेवता येईल, अशी अपेक्षा रिझव्र्ह बँकेने मंगळवारी व्यक्त केली.
रिझव्र्ह बँकेने मंगळवारी या वर्षांतील पहिल्या द्विमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. त्यात ही अपेक्षा व्यक्त केली.
सध्याच्या आकडेवारीनुसार अवकाळी पावसाने व गारपिटीने देशात रबी हंगामातील १७ टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. त्याने महागाईवर पारसा परिणाम झालेला नाही.
चालू वर्षी आतापर्यंत महागाईचा दर अपेक्षित मर्यादेत आहे. पण अल-निनोचा मॉन्सूनवर फारसा परिणाम झाली नाही आणि सामान्य प्रमाणात पाऊस झाला तर फारसे काळजीचे कारण राहणार नाही. ऑगस्ट महिन्यात महागाईचा दर ४ टक्क्य़ांवर असेल, तर वर्षअखेरीस तो ५.८ टक्क्य़ांच्या आसपास स्थिरावेल असा अंदाज आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2015 रोजी प्रकाशित
भिस्त चांगल्या पावसावर; ऑगस्टमध्ये ४ टक्के महागाईच्या दराची अपेक्षा
गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे झालेले नुकसान हे महागाई वाढण्यास कारणीभूत ठरू शकत असले तरी यंदा मोसमी पाऊस चांगला झाल्यास येत्या ऑगस्टमध्ये
First published on: 08-04-2015 at 06:32 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India august inflation rate depends on rain