टाटा, महिंद्रकडून माफक दरातील घरांसाठी प्राधान्य दिले गेलेल्या पश्चिम रेल्वे मार्गावरील बोईसरमध्ये परिसरातील सर्वात मोठे या गटातील निवासी संकूल साकारण्यात येत आहे. अरुण मुछाला समूहामार्फत ३,००० हजार घरांच्या या संकुलातील पहिला टप्पा यंदाच्या दिवाळीत पूर्ण होणार आहे.
स्थावर मालमत्ता, आदरातिथ्य क्षेत्रातील आघाडीच्या अरुण मुछाला समूहातील साईबाबा बोऊलेवार्ड प्रकल्पांतर्गत एकूण ११० एकर जागेवर ३,००० घरांचे निवासी संकुल उभारण्यात येणार आहे. वन बीएचके ते टू१/२बीएचके प्रकारातील तळमजला व दोन मजले अशा इमारतीत असतील.
या एकूण प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून पहिला टप्प्यातील घरे यंदाच्या दसरा-दिवाळी दरम्यान उपलब्ध होतील, अशी माहिती कंपनीचे अरुण मुछाला समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सुरज मुछाला यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
ही घरे २० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीची आहेत. परिसरात आवारात १७ औद्योगिक प्रकल्प, १९५ निवासी संकुल; तसेच ८३२ विक्री दालने असतील. तीन टप्प्यातील हा प्रकल्प २०१७ पर्यंत पूर्ण होणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील बोईसर परिसरात सध्या टाटा हाऊसिंग, महिंद्र अॅन्ड महिंद्रद्वारेही माफक दरातील घरे उभारली गेली आहेत. किंबहुना माफक दरातील पहिला प्रकल्प उभय कंपन्यांनी याच भागातून सुरू केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th May 2015 रोजी प्रकाशित
बोईसरमधील सर्वात मोठे माफक दरातील निवासी संकुल दिवाळीत
टाटा, महिंद्रकडून माफक दरातील घरांसाठी प्राधान्य दिले गेलेल्या पश्चिम रेल्वे मार्गावरील बोईसरमध्ये परिसरातील सर्वात मोठे या गटातील निवासी संकूल
First published on: 19-05-2015 at 07:41 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra lifespace launches affordable housing project at boisar