मफतलालचे डेनिम कलेक्शन व्हिंटेज आणि फ्रेश लुक्सच्या समागमाच्या रचना असलेले स्प्रिंग समर १५ डेनिम कलेक्शन मफतलाल इंडस्ट्रीजने प्रस्तुत केले आहे. वजनाने अत्यंत हलक्या आणि ताणल्या जाणाऱ्या वैशिष्टय़पूर्ण कापडाचा या फॅशन डेनिम श्रेणीत समावेश केला गेला आहे. वेगवेगळ्या गरजांनुरूप त्यांचे जॉगर्स डेनिम, ब्लॅक डेनिम, प्रिंट मेनिया, टोटल ब्ल्यू आणि कम्फर्ट स्ट्रेच असे प्रकार स्त्री, पुरुष आणि लहानग्यांच्या वस्त्रांसाठी आणले गेले आहेत.
डेलेक्टाचा गरम पेय उपकरणांच्या क्षेत्रात प्रवेशदुग्धजन्य उत्पादनांतील अग्रणी डेलेक्टा फूड्स प्रा. लि.ने चहा आणि कॉफीशी संलग्न सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘डेलेक्टा कॅफे’ हे उत्पादन प्रस्तुत केले आहे. हे परिपूर्ण गरम पेय प्रस्तुतीची उपाययोजना असून, त्यात डेलेक्टा थर्मोपॉट, दर्जेदार चहाचे तीन प्रकार, कॉफी सॅशे, कॉफी प्रीमिक्स, लिक्विड डेअरी क्रीमर्स आणि शुगर स्टीक्स, पेपर कप्स, पेपर नॅपकिन्स आणि ढवळण्याचे काम करणारा स्टरर अशी अन्य उपयुक्त वस्तूंचा समावेश आहे. एका वेळी सहा कप गरम चहा अथवा कॉफी तयार करू शकणारे हे विद्युत उपकरण घर, छोटे कार्यालय अथवा हॉटेल रूम्ससाठी उपयुक्त आहे, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्य़ातील प्रकल्पातून ते तयार केले गेले आहे.
इको बाथ टॉवेल्स
शारीरिक निगेत दैनंदिन आंघोळ अत्यंत महत्त्वाची असून, जेथे काही कारणाने आंघोळ करणे शक्य नसेल अशा वेळी किटाणांपासून दीर्घकाळ संरक्षण पुरविणाऱ्या आणि ताजातवाने अनुभव देणारे बॉडी वाइप्सची प्रस्तुती आरोग्य व स्वच्छताविषयक उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या केअरनाऊ मेडिकल प्रा. लि.ने केली आहे. आयएसएच इंटरनॅशनलच्या संयुक्त विद्यमाने आलेले अत्याधुनिक आणि नैसर्गिकरीत्या अत्यंत लाभदायी असे हे इको बाथ टॉवेल्स १०० टक्के विघटनशील व विणून तयार न केलेल्या कापडापासून बनविली गेली असून, एकदा वापरून झाल्यावर टाकून देता येतात. ही टॉवेल्स मल्टि-पॅक (१० वाइप्स) आणि सिंगल पॅक अशा दोन स्वरूपात अनुक्रमे १२० रुपये आणि १० रुपये किमतीला निवडक शहरातील इस्पितळे, फार्मसी, रिटेल आऊटलेट्स उपलब्ध झाली आहेत.
सिम्फनीचे विण्डो श्रेणीतील एअर कूलरआघाडीच्या एअर कूलर कंपनी सिम्फनीने यंदाच्या उन्हाळ्यातील मोसमासाठी विण्डो श्रेणीतील नवी उत्पादने सादर केली आहेत. पाच विविध प्रकारांत सादर करण्यात आलेल्या कूलरपैकी तीन कूलरची बॉडी ही प्लॅस्टिकची तर दोनची मेटलची आहे. कूलरमध्ये आपोआप पाणी भरण्यासाठी डय़ुरा पम्प तंत्रज्ञानाचा फ्लोट वॉल्व्ह आहे.
क्रॉक्सची रंगबिरंगी पादत्राणेअमेरिकेच्या नॅसडॅकवर सूचिबद्ध असलेली व एक अब्ज वार्षिक महसूल मिळविणारी क्रॉक्स या पादत्राण क्षेत्रातील आघाडीची कंपनीने यंदाच्या उन्हाळ्याच्या मोसमात पायांना सुखद वारा देण्याबरोबरच रंगसंगती आणि अनोख्या डिझाइनमधील पादत्राणे कंपनीने सादर केली आहेत. मुलांबरोबरच आई-वडील यांना घरात तसेच घराबाहेर घालण्यायोग्य अशा या पादत्राणांच्या किमती २,२९५ पासून सुरू होतात.
वाइल्ड स्टोनचे ‘थंडर’ डिओ
पुरुषांसाठी डिओडरण्टचा आघाडीचा ब्रॅण्ड वाइल्ड स्टोनने चालू वर्षांतील आपली पहिली प्रस्तुती म्हणून ‘वाइल्ड स्टोन थंडर’ सादर केले आहे. तजेला देणारा नैसर्गिक मातीचा आणि फुल-फळांच्या दरवळाचा सुवास हे या नवीन थंडर श्रेणीचे वैशिष्टय़ ठरावे. विशेषत: आपल्याकडील उष्ण हवामान व वातावरण लक्षात घेऊन याचा सुगंध ठरविण्यात आला आहे. वाइल्ड स्टोन थंडर १५० मि.लि.च्या पॅकमध्ये १९५ रुपये किमतीत उपलब्ध झाले आहे.
निव्हियाची पुरुषांसाठी शेव्हिंग रेंज जगातील आघाडीची पुरुष सौंदर्यप्रसाधन नाममुद्रा ‘निव्हिया’ने ‘मेन फ्रेश अॅक्टिव्ह शेव्हिंग रेंज’ भारतात प्रथमच सादर केली आहे. या फ्रेश अॅक्टिव्ह श्रेणीत- आफ्टर शेव्ह लोशन १०० मि.लि. (किंमत १९९ रु.), आफ्टर शेव्ह बाम १०० मि.लि. (२२५ रु.), आफ्टर शेव्हिंग फोम २०० मि.लि. (१९९ रु.) आणि शेव्हिंग जेल २०० मि.लि. (२४९ रु.) अशी विविध चार उत्पादने प्रस्तुत झाली आहेत. या आधी बाजारात आलेल्या फ्रेश अॅक्टिव्ह डिओ आणि रोल-ऑन उत्पादनांप्रमाणे या उत्पादनांनाही उमदा प्रतिसाद कंपनीला अपेक्षित आहे.
हळदयुक्त एव्हरयूथ फेस वॉशझायडस वेलनेसने तुळशी, हळदीचा अंश असलेले एव्हरयूथ फेस वॉश सादर केले आहे. पुरळ तसेच चेहऱ्यावरील डाग नाहीसे करण्यास हे उपयुक्त ठरते, असा दावा यानिमित्ताने कंपनीने केला आहे. फेस वॉशमध्ये वेगाने वाढणाऱ्या श्रेणीत या उत्पादनाचा समावेश कंपनीने केला आहे. यातील नॅनो अॅक्टिव त्वचा पेशीस उपयुक्त असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ५० मिलीग्रॅम फेस वॉशची किंमत ३५ रुपये आहे.
स्टँडर्डचे प्रीमियम पंखेजागतिक ब्रॅण्ड हॅवेल्सचे एक अंग असलेल्या स्टँडर्ड इलेक्ट्रिकल्सने प्रीमियम श्रेणीतील विविध १२ पंखे सादर केली आहेत. टेबलावर ठेवण्याचे, स्टँडवर उभे असणारे आणि भिंतीवर तसेच छतावर लावले जाणारे हे पंख्यांचे प्रकार असून, उत्कृष्ट डिझाइन व सौंदर्यपूर्ण वैविध्यामुळे ते घर-कार्यालयाच्या अंतर्गत सजावटीतही भर घालतात. छतावरील पंख्यांमध्ये कंपनीने क्रूझर, रोव्हर, स्टेलर, ब्रीझर आणि सेलर अशा पाच मॉडेल्स आकर्षक रंगात व रचनेत प्रस्तुत केले आहेत.