17 January 2021

News Flash

बाजाराचा तंत्र कल : नफावसुलीसाठी विक्री महत्त्वाचीच!

समभागसंच बांधणीचा वार्षिक आढावा

समभागसंच बांधणीचा वार्षिक आढावा

आशीष ठाकूर

गेल्या वर्षी याच सुमारास, अर्थात करोनापूर्व काळात निर्देशांक अशीच नवनवीन शिखरे सर करत होता, तेव्हादेखील २३ डिसेंबर २०१९चा लेख ‘अनर्थ टाळायचा तर’ आणि आणि ३० डिसेंबरचा लेख ‘लक्ष्यपूर्ती’ या शीर्षकांनिशी होता. त्या दोन लेखांचे स्मरण हे त्यामध्ये सूचित केलेले सामाईक मुद्दे. ते असे होते की – ‘‘आता सेन्सेक्सवर ४२,००० ते ४२,५०० आणि निफ्टीवर १२,४०० ते १२,५०० चा ऐतिहासिक उच्चांक हा ‘फेबुनासी कालमापन पद्धती’प्रमाणे जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात अथवा २४ ते ३१ जानेवारीच्या दरम्यान साध्य होईल. तेव्हा अल्पमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी आपल्या समभागांची नफारूपी विक्री करून, भांडवल आणि नफा सुरक्षित करावा.’’ यासाठी महात्मा जोतिबा फुलेंच्या क्रांतिकारी विचारांचा आधार घेतलेला होता.

‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले.. इतके अनर्थ एका अविद्येने केले.’’ हे जोतिरावांचे क्रांतिकारी विचार आजच्या भांडवली बाजारालादेखील तंतोतंत लागू पडतात. भांडवली बाजारातील सगळे आर्थिक अनर्थ हे केवळ तेजीत समभाग विकले नाहीत म्हणून घडतात. २० जानेवारी २०२० ला सेन्सेक्सने ४२,२७३ आणि निफ्टीने १२,४३० चा उच्चांक नोंदविला, तर २४ मार्चला सेन्सेक्सवर २५,६३८ आणि निफ्टीवर ७,५११ चा नीचांक दिसून आला.

या मंदीतील खरेदीची सुवर्णसंधी साधत ६ एप्रिलच्या लेखात समभागसंच बांधणीसाठी १५ समभाग सुचविले होता. वर्षअखेरीस त्यांचा आढावा आणि परतावा खालीलप्रमाणे-

१) अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्केट लिमिटेड(डी-मार्ट) :  रु. २,०६७ वरून २,७५५ रुपयांचा उच्चांक ९ डिसेंबरला नोंदवला, २४ डिसेंबरचा बंद भाव २,६७३ रुपये

२) आयआरसीटीसी लिमिटेड : रु. १,०८३ वरून रु. १,८०० रुपयांचा उच्चांक ८ डिसेंबरला नोंदवला, २४ डिसेंबरचा बंद भाव १,४०८ रुपये

३) आयटीसी लिमिटेड : १७८ वरून २१८ रुपयांचा उच्चांक १४ डिसेंबरला नोंदवला, २४ डिसेंबरचा बंद भाव २०८ रुपये

४) नवीन फ्लोरीन इंटरनॅशनल लिमिटेड : १,२६७ वरून २,७५० रुपयांचा उच्चांक २४ नोव्हेंबरला नोंदवला,२४ डिसेंबरचा बंद भाव २,५५० रुपये

५) बलरामपूर चिनी : ११४ वरून १८५ रुपयांचा उच्चांक १६ डिसेंबरला नोंदवला, २४ डिसेंबरचा बंद भाव १७५ रुपये

६) अजंठा फार्मा लिमिटेड : १,३१२ वरून १,७५९ रुपयांचा उच्चांक १० ऑगस्टला नोंदवला,२४ डिसेंबरचा बंद भाव १,६७० रुपये

७) आयओएल केमिकल्स लिमिटेड : १९३ वरून ८९८ रुपयांचा उच्चांक २५ ऑगस्टला नोंदवला, २४ डिसेंबरचा बंद भाव ७१३  रुपये

८) अ‍ॅक्झो नोबेल इंडिया लिमिटेड : २,०६६ वरून २,३१० रुपयांचा उच्चांक १६ डिसेंबरला नोंदवला,२४ डिसेंबरचा बंद भाव २,२३२ रुपये

९) वेदान्त लिमिटेड : ६३ वरून १६३ रुपयांच्या उच्चांकी भावावर २४ डिसेंबरचा बंद भाव

१०) सिप्ला लिमिटेड : ४४९ वरून ८३९ चा उच्चांक १३ ऑक्टोबरला नोंदवला, २४ डिसेंबरचा बंद भाव ८३३ रुपये

११) टाटा केमिकल्स लिमिटेड : २१८ वरून ५२७ रुपयांचा उच्चांक ७ डिसेंबरला नोंदवला, २४ डिसेंबरचा बंद भाव ४७६ रुपये

१२) एफडीसी लिमिटेड : २०० वरून ३७९ रुपयांचा उच्चांक २९ सप्टेंबरला नोंदवला, २४ डिसेंबरचा बंद भाव ३३१ रुपये

१३) इंडिया सिमेंट लिमिटेड : १०१ वरून १६३ रुपयांचा उच्चांक २६ नोव्हेंबरला नोंदवला, २४ डिसेंबरचा बंद भाव १४५ रुपये

१४) सीडीएसएल लिमिटेड : २१० वरून ५६६ रुपयांचा उच्चांक ४ डिसेंबरला नोंदवला, २४ डिसेंबरचा बंद भाव ५१७ रुपये

१५) निप्पॉन इंडिया ईटीएफ निफ्टी बीज : ८६ वरून १५९ रुपयांचा उच्चांक १८ डिसेंबरला नोंदवला, २४ डिसेंबरचा बंद भाव १४६ रुपये

आठ महिन्यांत पंधरा समभागांनी उत्कृष्ट कामगिरी केली पण आयओएल केमिकल्सनी १९३ रुपयांवरून ८०० रुपये ही कामगिरी नेत्रदीपकच. तर शिफारस केलेल्या किमतीपासून दुप्पट झालेल्या समभागात नवीन फ्लोरीन, वेदान्ता, टाटा केमिकल्स, सीडीएसएल हे समभाग आहेत.

पुढे काय?

आताच्या घडीला निर्देशांकांवर ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ पाहायला हवा. सेन्सेक्सवर हा स्तर ४६,३०० आणि निफ्टीवर १३,५५० असा असेल. हा स्तर राखला गेल्यास निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४७,२०० ते ४८,००० आणि निफ्टीवर १३,८०० ते १४,००० असे असेल.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 12:02 am

Web Title: 2020 stock market year in review stock market performance in2020 zws 70
Next Stories
1 कर बोध – विवरणपत्र : वेळेवर दाखल न केल्यास?
2 टाळेबंदीतही तगलेली ‘पोलादी’ नाममुद्रा
3 बंदा रुपया : पारदर्शकतेचे ‘प्रीमियम’!
Just Now!
X