वसंत माधव कुळकर्णी

या फंडाची शिफारस १३ जानेवारी रोजी केली होती. या वर्षांत शिफारस होत असलेला हा शेवटचा फंड. एकाच कॅलेंडर वर्षांत दोन वेळा शिफारस करण्याचा दुर्मिळ योग या फंडाच्या वाटय़ाला येत असले तरी ही शिफारस दोन वेगवेगळ्या आर्थिक वर्षांतील आहेत. जन्मलेल्या कर आणि मरण चुकत नसते. म्हणून कर वाचविण्यासाठी दरवर्षी गुंतवणूक करावी लागते. आजच्या घडीला ४४ मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी ४२ कंपन्यांचे करबचत फंड आहेत. मागील शिफारशी वेळी मालमत्ता क्रमवारीत ३२ व्या क्रमांकावर असलेला हा फंड आज २४ व्या क्रमांकावर असून मागील शिफारशी एका वर्षांच्या कामगिरीच्या तुलनेत पाचव्या क्रमांकावर असलेला हा फंड दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. मागील वर्षभरात ईएलएसएस फंड गटाच्या क्रिसिल जोखीम समायोजित परताव्यात अव्वल क्रमवारी करणाऱ्या  फंडांपैकी एक फंड आहे. कमी मालमत्ता असली तरी अव्वल परतावा असल्याने मूर्ती लहान पण कीर्ती महान असे या फंडाबद्दल म्हणता येईल.

shreeyachebaba@gmail.com

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर