24th May Panchang & Marathi Horoscope: २४ मे २०२४ ला वैशाख कृष्ण पक्षाचा आरंभ होत आहे. शुक्रवारच्या दिवशी वैशाख पक्षातील प्रतिपदा तिथी असेल. संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटांपर्यंत ही तिथी कायम असेल. २४ मेच्या दुपारी ११ वाजून २२ मिनिटांपर्यंत शिव योग व त्यानंतर सिद्ध योग असणार आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजून ११ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र व त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र जागृत असणार आहे. २४ मे च्या दिवशी करवीर व्रत असणार आहे. आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाईल हे पाहुया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२४ मे पंचांग व राशीभविष्य

मेष:-व्यावहारिक कामे सुरळीत पार पडतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कचेरीची कामे मनाजोगी पार पडतील. कागदपत्रे नीट तपासून घ्या. आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे.

वृषभ:-जोडीदाराकडून लाभ होतील. आवडीच्या गोष्टींना वेळ मिळेल. मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता. गोडीने कामे साधून घेण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक कामात हातभार लावाल.

मिथुन:-दुसर्‍यावर अवलंबून राहू नका. कामात त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक कामे सावधानतेने करावीत. गप्पा मारण्यात अधिक वेळ घालवाल. क्षणिक आनंदाने खुश व्हाल.

कर्क:-खेळीमेळीत दिवस जाईल. घरात सर्व गोष्टीत टापटीपपणा ठेवाल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. सहकार्‍यांना कामात मदत कराल.

सिंह:-जवळच्या प्रवासाचा योग येईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. भावंडांना भेटण्याचा योग येईल. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद मिळेल. जोडीदाराचा स्वभाव आग्रही राहील.

कन्या:-कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. कामात घाई गोंधळ उडू शकतो. योग्य नियोजनावर भर द्यावा. काही गोष्टी अचानक घडू शकतात. चटपटीत पदार्थ खाल.

तूळ:-दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवावा. व्यवसायानिमित्त प्रवास घडेल. अचानक धनलाभाच्या घटना घडतील. तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. कामात अधिक कष्ट पडतील.

वृश्चिक:-मनाच्या चंचलतेला आवर घालावी. जोडीदाराच्या शब्दाला प्रमाण मानावे लागेल. भावंडांना मदत करावी लागेल. भागिदारीतून लाभ होईल. पतीच्या कमाईत वाढ होईल.

धनू:-मनमोकळ्या गप्पा मारल्या जातील. तुमच्यातील साहस वाढेल. नवीन अधिकार सावधानतेने वापरा. इतरांवर अधिक विसंबून राहू नका. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा.

मकर:-कामाला चांगली गती येईल. गोड शब्दातून संवाद साधावा. कामातून चांगले समाधान मिळेल. हातातील कामात यश येईल. दिवस चांगल्या कमाईचा असेल.

कुंभ:-आर्थिक व्यवहार सतर्कतेने करावेत. घरात तुमचा रूबाब राहील. इतरांना परोपकाराचे महत्त्व पट‍वून द्याल. जोडीदाराच्या सल्ल्याने वागावे लागेल. बौद्धिक छंद जोपासता येतील.

हे ही वाचा<< मोदींच्या पंच्याहत्तरीच्या चर्चेत ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; २०२६ नंतर गडकरींच्या कुंडलीत राजकीय बहुमानाचा योग

मीन:-जास्त अधीर होऊ नका. लष्कराच्या भाकर्‍या भाजायला जाऊ नका. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा. घरातील वातावरण खेळकर राहील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 th may panchang marathi huge money benefits adventures life mesh to meen rashi bhavishya friday lakshmi blessing astro today svs