Today’s Horoscope in Marathi, 31 May 2025 : ३१ मे २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी रात्री ८ वाजून १६ मिनिटांपर्यंत राहील. सकाळी १० वाजून ४३ मिनिटांपर्यंत वृद्धि योग जुळून येईल. रात्री ९ वाजून ८ मिनिटांपर्यंत पुष्य नक्षत्र जागृत असणार आहे. आज सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग जुळून येणार आहे. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १०:३० वाजेपर्यंत असणार आहे. सकाळी ११ वाजून ३२ मिनिटांनी शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. तर शुक्राचे राशी परिवर्तन तुमच्या आयुष्यात काय बदल घडवणार जाणून घेऊया…

३१ मे २०२५ पंचांग व राशिभविष्य (Horoscope Today In Marathi, 31 May 2025)

आजचे मेष राशिभविष्य (Today’s Aries Horoscope In Marathi)

काही गोष्टींबाबत फारच आग्रही राहाल. परिस्थिती अनुरूप विचार करावा. व्यवहार चातुर्य दाखवावे लागेल. धार्मिक कामातून मान मिळवाल. स्वत:बद्दलच्या चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका.

आजचे वृषभ राशिभविष्य (Today’s Taurus Horoscope In Marathi )

नवीन विचारांची कास धरावी. अती कर्मठपणे वागू नये. वडीलधार्‍या व्यक्तींचा मान राखावा. अती श्रमाचा थकवा जाणवेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगती करता येईल.

आजचे मिथुन राशिभविष्य (Today’s Gemini Horoscope In Marathi)

प्रतिकूलतेतून मार्ग काढावा लागेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. फसव्या लोकांपासून सावध राहावे. रेस, जुगार यांतून नुकसान संभवते. काही क्षणिक गोष्टींचा लाभ होईल.

आजचे कर्क राशिभविष्य (Today’s Cancer Horoscope In Marathi)

भागीदारीच्या व्यवसायात संयम बाळगावा लागेल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. मनातील इच्छा मोकळेपणाने बोलून दाखवावी. अती विचार करण्यात वेळ वाया जाईल.

आजचे सिंह राशिभविष्य (Today’s Leo Horoscope In Marathi)

लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. वाट विकार बळावू शकतात. क्षुल्लक गोष्टींवरून मनस्तापाची शक्यता. कष्टाशिवाय पर्याय नाही. वादाच्या मुद्द्यांपासून दूर राहावे.

आजचे कन्या राशिभविष्य (Today’s Virgo Horoscope In Marathi )

इतरांचा विश्वास संपादन करावा. अती व्यवहारी वागून चालणार नाही. चिकाटीने कामे तडीस न्याल. वरिष्ठांची नाराजी दूर करावी लागेल. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

आजचे तूळ राशिभविष्य (Today’s Libra Horoscope In Marathi )

स्थावरची कामे मार्गी लागतील. बर्‍याच दिवसांपासून रखडलेली कामे सुरू होतील. व्यवसायाच्या दृष्टीने काही नवीन योजना अंमलात आणाल. उत्तम गृहसौख्य लाभेल. मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्या.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Today’s Scorpio Horoscope In Marathi )

कामानिमित्त प्रवास करावा लागेल. हातातील अधिकारात वाढ होईल. तुमच्यातील        सुसंस्कृतपणा दिसून येईल. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. काही गोष्टीत तडजोड स्वीकारावी लागेल.

आजचे धनू राशिभविष्य (Today’s Sagittarius Horoscope In Marathi )

इतरांच्या मदतीशिवाय कामे पूर्ण करावीत. वडिलोपार्जित कामांतून लाभ संभवतो. मोजकेच बोलण्यावर भर द्याल. आर्थिक बाबतीत विचारांती निर्णय घ्यावा. अती काटकसर करून चालणार नाही.

आजचे मकर राशिभविष्य (Today’s Capricorn Horoscope In Marathi)

चटकन निराश होऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. आरोग्याच्या बाबतीत चालढकल करू नका. अडथळ्यातून मार्ग निघेल. प्रौढपणे आपले विचार मांडावेत.

आजचे कुंभ राशिभविष्य (Today’s Aquarius Horoscope In Marathi )

मानापमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. घराबाहेर वावरतांना सावध राहा. हित शत्रूंकडे लक्ष ठेवावे लागेल. आर्थिक गुंतवणूक तूर्तास टाळावी. क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड वाढू शकते.

आजचे मीन राशिभविष्य (Today’s Pisces Horoscope In Marathi )

मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. तुमच्यातील कलेला चांगली दाद मिळेल. चार-चौघांत तुमचा दर्जा वाढेल. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर