Rashi Bhavishya In Marathi, 5 may 2025 : ५ मे २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी सकाळी ७ वाजून ३६ मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर नवमी तिथी सुरु होईल. आश्लेषा नक्षत्र दुपारी २ वाजून १ मिनिटांपर्यंत जागृत असेल. वृद्धि योग रात्री १२ वाजून २० मिनिटांपर्यंत जुळून येईल. राहू काळ ७:३० वाजता सुरु होईल ते ९ पर्यंत असणार आहे. आज वैशाख शुद्ध अष्टमीला शंकर महाराजांची पुण्यतिथी म्हणजेच स्मरण दिन आहे. तर आठवड्याची सुरुवात तुमच्या राशीसाठी कशी असणार हे आपण जाणून घेऊया…

५ मे पंचांग व राशिभविष्य (Dainik Rashi Bhavishya in Marathi, 5 May 2025)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)

घरात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. केलेल्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. कौटुंबिक खर्च वाढीस लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)

काम आणि वेळ यांचे योग्य नियोजन करावे. सर्व बाबींचा अंदाज बांधावा लागेल. नवीन विचार अंमलात आणाल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. बदलांकडे वेगळ्या नजरेने पहावे.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)

लपवाछपवी करू नका. फसवणुकीपासून सावध राहावे. मनातील नैराश्य काढून टाकावे. क्षणिक गोष्टींचा आनंद घ्याल. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)

मोठ्या लोकांची घरी ऊठबस वाढेल. योग्य मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. कामात स्त्रियांची मदत मिळेल.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)

चारचौघात तुमची कला सादर करता येईल. सरकारी कामे मार्गी लागतील. मध्यस्थीच्या कामातून चांगला लाभ मिळेल. जोडीदाराची बाजू विचारात घ्यावी. क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)

मानसिक व्यग्रता जाणवेल. सहकार्‍यांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे. नातेवाईकांना मदत करावी लागेल. वादातून मानसिक ताण वाढू शकतो.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)

योग्य संधीची वाट पहावी. काही कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. स्वभावात काहीसा चीड-चीडे पणा येईल. जोडीदाराविषयी गैरसमज करू नयेत.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)

भागीदारीतून चांगला लाभ होईल. शक्यतो प्रवास टाळावा. पत्नीचे वर्चस्व राहील. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. आपल्याच मताचा आग्रह धरू नका.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathii)

जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे. आरोग्यात सुधारणा होईल. नातेवाईकांची योग्य वेळी मदत घेता येईल. भावंडांशी मतभेद संभवतात.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)

जोडीदाराचे वागणे दुराग्रही वाटू शकते. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. नवीन लोकांच्या ओळखी होतील. घरगुती प्रश्नांबाबत आग्रही भूमिका घ्याल. संयम सोडून चालणार नाही.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)

स्वत:चेच म्हणणे खरे कराल. इतरांचे मत देखील विचारात घ्यावे. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. क्षुल्लक गोष्टींचा त्रागा करू नका. आपली छाप पडण्यात यशस्वी व्हाल.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)

हातात नवीन अधिकार येतील. तुमच्या कलेला प्रोत्साहन दिले जाईल. कोणाशीही उघड उघड शत्रुत्व पत्करू नका. आपले त्रासाला स्वत:च कारणीभूत होऊ नका. कामातील बदलांकडे लक्ष ठेवावे.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर