6 March 2025 Horoscope : ६ मार्च २०२५ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी सकाळी १० वाजून ५१ मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल. सकाळी १० वाजून ४६ मिनिटांपर्यंत विष्कंभ योग जुळून येईल. तसेच रोहिणी नक्षत्र आज रात्री १२ वाजून ६ मिनिटांपर्यंत जागृत असेल. आज राहू काळ १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. तर आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असणार हे आपण जाणून घेऊया…

६ मार्च पंचांग व राशिभविष्य:

मेष:- झोपेची तक्रार जाणवेल. खर्च काही प्रमाणात वाढू शकतो. लहानशा पराजयाने निराश होऊ नका. इतरांवर आपली छाप पाडाल. लहानात लहान होऊन रमाल.

वृषभ:- स्वत:चा फायदा काढण्यात यशस्वी व्हाल. अधिकारांचे मार्गदर्शन मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. लेखकांच्या लिखाणाला गती येईल.

मिथुन:- मनातील इच्छा पूर्ण होईल. हातातील कामात यश येईल. दैनंदिन कमाई चांगली होईल. मोठ्या लोकांच्या ओळखी वाढतील. मुलांसाठी नवीन वस्तु खरेदी कराल.

कर्क:- कलेतून चांगले मानधन मिळेल. आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न कराल. वडीलधार्‍यांचे मत विरोधी वाटू शकते. मानसिक ताणतणाव दूर करावा. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

सिंह:- कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. प्रिय व्यक्तीशी मतभेद संभवतात. मुलांच्या वागण्याचा गांभीर्याने विचार करावा. गुरुकृपेचा लाभ होईल. चांगली संगत लाभेल.

कन्या:- वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी मतभेद संभवतात. चार-चौघांत विरोधी मत मांडू नका. जोडीदाराचा काहीसा दबाव राहील. कौटुंबिक कामांतून धनप्राप्ती होईल.

तूळ:- कौटुंबिक ताणतणाव जाणवेल. हातापायास किरकोळ इजा संभवते. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. मुलांच्या चिंता लागून राहतील.

वृश्चिक:- स्वत: चेच मत खरे कराल. आवश्यकता नसताना सुद्धा खर्च होईल. घरात नातेवाईकांचा गोतावळा जमा होईल. कर्तबगारीला चांगला वाव आहे. जोडीदाराशी मतभेद संभवतात.

धनू:- नातेवाईकांच्या समस्या सोडवाल. स्वत:मध्ये काही बदल कराल. प्रवासात काही त्रास होण्याची शक्यता आहे. अडथळ्यातून मार्ग काढावा. उगाच चीड-चीड करू नये.

मकर:- मनातील आकांक्षा पूर्ण होईल. त्रासातून मार्ग निघेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. धाडसाने कामे हाती घ्याल. आरोग्यात सुधारणा संभवते.

कुंभ:- कौटुंबिक जबाबदारी वाढेल. नवीन मित्र जोडावेत. हस्त कलेसाठी वेळ काढावा. सामुदायिक भांडणापासून दूर राहावे. मानापमानाच्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करावे.

मीन:- कामाचा आवाका लक्षात घ्यावा. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. जोडीदाराचा छानसा सहवास लाभेल. कौटुंबिक सौख्यास प्राधान्य द्याल. लपवाछपवीचे व्यवहार करू नका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर