scorecardresearch

शेकडो वर्षांनंतर बनतोय ‘पंचमहायोग’; ‘या’ राशींना मिळेल बक्कळ धनलाभ? गुरु मीन राशीत अस्त होताच लाभू शकते श्रीमंती

महत्वाची बाब म्हणजे हा शुभ योग तब्बल ७०० वर्षांनंतर बनणार आहे.

Mahaashtami shubh yog
महाअष्टमीला ग्रहांचा एक अद्भुत योग बनत आहे. (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट काळाने गोचर करतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. यासोबतच अनेक वर्षानंतर असे काही दुर्मिळ योग तयार होतात, ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. सध्या महाअष्टमीला असाच एक ग्रहांचा अद्भुत योग बनत आहे. महत्वाची बाब म्हणजे हा शुभ योग तब्बल ७०० वर्षांनंतर बनणार आहे. कारण गुरु सध्या स्वतःच्या राशीत मीन राशीत स्थित आहे आणि २८ मार्चला मीन राशीतच अस्त होणार आहे. यानंतर मेष राशीत बुध प्रवेश करेल. दुसरीकडे, सूर्य मीन राशीत आहे आणि शनि स्वतःची राशी कुंभमध्ये आहे. याशिवाय शुक्र आणि राहू मेष राशीत आहेत. या ग्रहांचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. परंतु ३ राशी अशा आहेत, ज्यांची या काळात धनलाभसह प्रगतीची होण्याची शक्यता आहे. त्या भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया.

कर्क राशी –

कर्क राशीसाठी ५ महायोग शुभ सिद्ध होऊ शकतात. कारण तुमच्या गोचर कुंडलीत हंस आणि मालव्य राजयोग तयार होत आहेत. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, यादरम्यान तुम्हाला उत्पन्नाचे इतर स्रोतही मिळू शकतात. तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते. मात्र, यावेळी तुम्हाला प्रयत्न आणि मेहनत करणं गरजेचं आहे. कारण शनीची ढैया तुमच्यावर चालू असल्यामुळे तुम्ही फक्त मेहनत करूनच काही गोष्टी मिळवू शकता.

मिथुन राशी –

मिथुन राशीच्या लोकांसाठी पाच महायोग फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कारण शनिदेव तुमच्या राशीतून नवव्या स्थानी गोचर करत आहेत. त्यामुळे या काळात तुम्ही भाग्यवान होऊ शकता. त्याच वेळी, तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढण्यासह मित्रांबरोबरचे संबंध अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायासंदर्भात प्रवास घडू शकतो, जो तुमच्यासाठी शुभ ठरु शकतो.

मकर राशी –

मकर राशीसाठी ५ महायोग बनणे अनुकूल ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीतून धनाच्या स्थानी भ्रमण करत आहेत. तर गुरु तृतीय स्थानी प्रवेश करत आहे. त्यामुळे या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता किंवा वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळवू शकता. तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच तुम्हाला बहिण-भावाचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी होऊ शकता. तसेच अविवाहितांचे लग्न ठरण्याचीही शक्यता आहे.

(टीप: वरील दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 18:13 IST

संबंधित बातम्या