Akshaya Tritiya 2025 Gold Buying Shubh Muhurat : अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील सर्वांत शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य कोणत्याही शुभ मुहूर्ताशिवाय करता येते. हिंदू पंचागांनुसार, अक्षय्य तृतीयेचा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. या वर्षी अक्षय्य तृतीयेला अनेक शुभ योग निर्माण होत आहेत. या काळात सोने, चांदी आणि इतर वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.

या वर्षी अक्षय्य तृतीया तिथी २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी सुरू होत आहे आणि ३० एप्रिल रोजी दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी समाप्त होत आहे. उदय तिथीनुसार, अक्षय्य तृतीयेचा सण ३० एप्रिल रोजी साजरा केला जाईल. त्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने अनेक पटींनी जास्त फळ मिळते. तसेच, घरात आनंद आणि शांती नांदते ,असे मानले जाते. या वर्षी तुम्हाला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी फक्त एक नाही, तर दोन दिवस सोने, चांदी इत्यादी खरेदी करण्याची संधी मिळू शकते. अक्षय्य तृतीयेला सोने आणि चांदी कधी खरेदी करावी याबद्दल जाणून घेऊ…

अक्षय्य तृतीया २०२५ तिथी (Akshaya Tritiya 2025 Date)

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आरंभ – २९ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ५.३१ वाजता.

तृतीया तिथी समाप्ती – ३० एप्रिल २०२५ रोजी दुपारी २.१२ वाजता.

अक्षय तृतीया २०२५ तारीख – उदय तिथीनुसार अक्षय तृतीयेचा सण ३० एप्रिल रोजी साजरा केला जाईल.

अक्षय्य तृतीया २०२५ पूजा मुहूर्त (Akshaya Tritiya 2025 Puja Muhurat)

३० एप्रिल रोजी सकाळी ५ वाजून ४१ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून १२ मिनिटांपर्यंत पूजेसाठी सर्वांत शुभ वेळ आहे. त्याचा एकूण कालावधी सहा तास ३१ मिनिटे असेल.

सोने खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त (Akshaya Tritiya 2025 Gold Silver Purchase Time)

२९ एप्रिल २०२५ रोजी सोने आणि चांदी खरेदी करण्याची वेळ

ही वेळ संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी सुरू होईल आणि ३० एप्रिल रोजी दुपारी २:१२ पर्यंत असेल. आज शुभ चौघडिया मुहूर्त रात्री ०८ वाजून १६ मिनिटांपासून ते ०९ वाजून ३७ मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर रात्री १० वाजून ५७ मिनिटांपासून ते पहाटे ०३ वाजेपर्यंत असेल.

३० एप्रिल रोजी सोने-चांदी खरेदी करण्याची शुभ वेळ

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याची वेळ सकाळी ०५ वाजून ४१ मिनिटांपासून ते दुपारी ०२ वाजून १२ मिनिटांपर्यंत आहे. शुभ चौघडिया मुहूर्त सकाळी ०५ वाजून ४१ मिनिटांपासून ते ०९ वाजेपर्यंत आणि नंतर सकाळी १० वाजून ३९ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून १८ पर्यंत असेल.

अक्षय्य तृतीयेला तुम्ही काय खरेदी करू शकता? (Akshaya Tritiya Purchase Items)

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने-चांदीव्यतिरिक्त इतर अनेक वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. या वर्षी,अक्षय्य तृतीयेच्या दिवशी, सोने आणि चांदीव्यतिरिक्त, कापूस, पितळेची भांडी, पिवळी मोहरी, मातीचे भांडे, जव, सैंधव मीठ, धार्मिक पुस्तके, तसेच नवीन घर, मालमत्ता, वाहन इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते.