Anant Chaturdashi 2022: हिंदू धर्मात अनंत चतुर्दशी व्रताला खूप महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरमधील भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या १४ व्या दिवशी अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जनही केले जाते. साधारणतः गणेश विसर्जनाचा दिवस म्हणून या सणाची ओळख असली तरी या दिवशी भगवान विष्णू यांच्या स्मरणाचे विशेष महत्त्व आहे. संपूर्ण देशात अनंत चतुर्दशीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात. यावर्षी अनंत चतुर्दशीचा सण ९ सप्टेंबर २०२२ रोजी शुक्रवारी आहे. हा दिवस भगवान श्री विष्णूच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. यादिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनंत चतुर्दशी २०२२ तिथी

  • चतुर्शी तिथी : ८ सप्टेंबर २०२२, गुरुवार संध्याकाळी ४.३० वाजता
  • चतुर्दशी तिथी समाप्ती : ९ सप्टेंबर २०२२, शुक्रवार दुपारी १:३० वाजता

अनंत चतुर्दशी पूजेचा शुभ मुहूर्त

९ सप्टेंबर २०२२, शुक्रवार, संध्याकाळी ६.३० ते १.३०पर्यंत

( हे ही वाचा: Astrology: जन्मकुंडलीत दडले आहे तुमच्या भक्तीचे रहस्य; कुंडलीतून जाणून घ्या व्यक्तीची देवाप्रती असलेली भक्ती)

गणेश विसर्जन शुभ मुहूर्त (Ganesh Visarjan Shubh Muhurth)

सकाळचा मुहुर्त- शुक्रवार सकाळी ०६.०३ ते १०.४४ पर्यंत

सायंकाळचा मुहूर्त – संध्याकाळी ५ ते ०६.३४ पर्यंत

दिवसाचा मुहूर्त – १२.१८ ते ०१.५२ पर्यंत

रात्रीचा मुहूर्त – शनिवार रात्री ०९.२६ ते १०.५२ पर्यंत

मध्य सत्राचा मुहूर्त – शनिवार रात्री १२.१८ ते १० सप्टेंबर सकाळी ०४.४७ पर्यंत

( हे ही वाचा: स्वप्नात गणपतीचे दर्शन होणे शुभ की अशुभ? देवदर्शन झाल्यास त्याचे अर्थ काय? जाणून घ्या)

अनंत चतुर्दशीचे महत्त्व (Significance of Anant Chaturdashi)

साधारणतः गणेश विसर्जनाचा दिवस म्हणून या सणाची ओळख असली तरी या दिवशी भगवान विष्णू यांच्या स्मरणाला विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार अनंत चतुर्दशीचे मूळ महाभारतात आहे. हा दिवस भगवान विष्णूचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तल, अटल, प्राण, सुतला, तलतल, रसातल, पातल, भी, भुव, जना, तप, सत्य, महा, असे १४ जग ईश्वराने निर्माण केले. त्यांचे पालन करण्यासाठी भगवान विष्णू १४ वेगवेगळ्या अवतारांत या जगात आले आणि त्यामुळे त्यांना अनंत नाव पडले. हे सर्व जग आणि त्याच्या निर्मितीचे जतन करण्यासाठी भगवान विष्णूंच्या या अवतारांनी मोठी भूमिका बजावली. त्यामुळे अनंत चतुर्दशीचा दिवस खूप महत्वाचा आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant chaturdashi 2022 date when is ganesh visarjan know the auspicious time and significance gps
First published on: 05-09-2022 at 11:30 IST