Budh Gochar 2025 Impact in Marathi: ग्रहांचा राजा बुध हा यंदाच्या वर्षातील सर्वात शक्तिशाली ग्रह असल्याचे वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी सांगितले आहे. बुध हा बुद्धिमत्ता, तर्कशुद्ध विचार, संवाद कौशल्य, व्यवसाय ज्ञान या सर्व वैशिष्ट्यांचा कारक मानला जातो. आता येत्या २३ मे रोजी दुपारी १ वाजता बुधदेव मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. यामुळे काही राशींच्या भाग्यात बुध ग्रह अत्यंत लाभदायक स्थानी येणार आहे. बुधदेवाच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींची सर्व प्रलंबित कामे मार्गी लागण्यास मदत होईल असे अंदाज आहेत. या राशी कोणत्या व त्यांना आर्थिक लाभासाठी कोणते मार्ग खुले होणार आहेत हे पाहूया…
बुधाचे गोचर होताच ‘या’ राशींचं पालटणार नशीब, सुवर्णकाळ होणार सुरु?
मिथुन
बुधाचे भ्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्ही या काळात पूर्ण करू शकता. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचे नशीब बदलण्यासाठी पावले उचलाल. नोकरी करणाऱ्यांच्या पद आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच जे अविवाहित आहेत, त्यांना लवकरच लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
सिंह
बुध ग्रहाचे हे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकते. पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते. उत्पन्नात वाढ होऊ शकते. व्यावसायिकांना व्यवसायात नफा मिळू शकेल. नोकरी शोधणाऱ्यांना लवकरच नवीन नोकरी मिळू शकेल. तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळू शकतो. आर्थिक योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकाल. समाजात तुमची मान-प्रतिष्ठा वाढू शकते. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ
बुध राशीचे हे भ्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरू शकते. व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील. अचानक मोठा नफा होऊ शकतो. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीचादेखील तुम्हाला लाभ मिळू शकतो. उत्पन्न वाढल्याने आर्थिक स्थिती सुधारु शकते. तसेच तुम्ही नवीन वाहन किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यास सक्षम असाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)