Budh Gochar: वैदिक ज्योतिषानुसार, ग्रहांचे गोचर माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम करतात. त्यामध्ये चंद्र आणि बुध हे ग्रह सर्वात वेगाने राशी बदलणारे ग्रह मानले जातात. त्यांच्या गोचरचा सर्व राशींवर खोलवर परिणाम होतो.

बुध तूळ राशीत आहे

ज्योतिष गणनेनुसार सध्या ग्रहांचा राजकुमार बुध तूळ राशीत गोचर करत आहे आणि २४ ऑक्टोबर २०२५ रोजी तो वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या बदलामुळे काही राशींच्या लोकांच्या जीवनात शुभ परिणाम दिसतील. त्यांच्यासाठी हा काळ धनवाढ, यश आणि नात्यांमध्ये सौहार्द घेऊन येईल. चला तर मग पाहूया, कोणत्या राशींसाठी बुधाचं हे गोचर भाग्यशाली ठरू शकतं.

बुध वृश्चिक राशीत गोचर

बुध ग्रह २४ ऑक्टोबर २०२५ रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करेल. बुधच्या या चाल बदलामुळे अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात चांगले बदल दिसतील. खास करून वृश्चिक, कुंभ आणि सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ ठरेल.

सिंह राशी (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं हे गोचर चौथ्या भावात होईल, जो सुख, संपत्ती आणि कुटुंबाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे हा काळ तुमच्या भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ घेऊन येऊ शकतो. घरात आणि कुटुंबात आनंद व शांतता राहील. वाहन किंवा मालमत्ता खरेदीस योग मिळतील. रिअल इस्टेट, जमीन आणि गुंतवणुकीशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याचे संकेत आहेत. हा काळ नशीब आणि मेहनत यांच्या संतुलनातून यश मिळवण्याचा आहे.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुधचा गोचर खूप शुभ ठरेल. या काळात बुध ग्रह तुमच्या राशीच्या लग्न भावात राहील, ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात, विचारांत आणि काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होईल. विवाहासाठी योग्य असलेल्या लोकांना चांगले प्रस्ताव मिळू शकतात. विवाहित जोडप्यांच्या दांपत्य जीवनात प्रेम आणि समज वाढेल. खूप काळ चाललेले कौटुंबिक वाद सुटू शकतात. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल आणि सन्मानही मिळेल. एकूणच हा काळ समृद्धी, आत्मविश्वास आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा असेल.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा राशी बदल करिअर आणि व्यवसायासाठी खूपच शुभ ठरेल. या काळात बुध ग्रह तुमच्या राशीच्या कर्म भावात राहील, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी प्रगती आणि यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नती मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन प्रोजेक्ट्स आणि गुंतवणुकीच्या संधी मिळतील. जुने कामे लवकर पूर्ण होतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. वडील किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील. हे गोचर तुमच्या व्यावसायिक वाढ आणि स्थिरतेचे प्रतीक आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)