Budh Ketu Yuti 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट कालावधीत गोचर करत इतर ग्रहांशी युती करतात, ज्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांवर दिसून येतो. ऑगस्ट महिन्यात बुध सिंह राशीत प्रवेश करणार आहे, जिथे केतू आधीच स्थित आहे, ज्यामुळे केतू आणि बुध यांची युती सिंह राशीत होणार आहे. अशा परिस्थितीत काही राशींचे भाग्य चमकू शकते. या राशींना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो, पण नेमक्या कोणत्या राशींना हा लाभ मिळेल जाणून घेऊ..

सिंह

केतू आणि बुध यांच्यातील युती सिंह राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येऊ शकतात. तुम्हाला करिअरमध्ये तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. भागीदारीच्या कामात लाभ मिळू शकतो. त्याचवेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी केतू आणि बुध यांची युती शुभ ठरू शकते. या काळात बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर वरिष्ठांकडून आणि सहकाऱ्यांकडूनही तुम्हाला चांगला पाठिंबा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या आणि संधी मिळू शकतात. सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते आणि नवीन लोकांशी ओळख होईल. जर तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळू शकते. त्याच वेळी व्यावसायिकांना चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनु

केतू आणि बुध ग्रहाची युती धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते. या काळात तुमचे नशीब चमकू शकते. तुम्ही ट्रिपचा प्लॅन करू शकता. यावेळी तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे आणि उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. तुम्हाला या काळात पालक किंवा वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. मानसिक शांती राहील आणि घरगुती बाबींमध्ये सुसंवाद साधता येईल.