Budha Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह २२ जून रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. २२ जून रोजी बुध ग्रहांचा राजकुमार मिथुन राशी सोडून कर्क राशीत प्रवेश करेल. बुधाचा राशी बदल सर्व राशींच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतो. पण १२ पैकी अशा तीन राशी आहेत, ज्यांना बुध गोचर खूप शुभ ठरू शकते.
पण, नेमकं कोणत्या राशींना बुधाचा राशी बदल फलदायी ठरू शकतो जाणून घेऊ…

मिथुन

बुध मिथुन राशीचा स्वामी आहे, त्यामुळे या राशींच्या लोकांना बुध गोचर होताच वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा मिळू शकतो. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही नफा होईल. मीडिया, सेल्स आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या या राशीच्या लोकांना अनपेक्षित फायदा मिळू शकतो. या काळात तुमच्या बोलण्यात नम्रता येईल, त्यामुळे सामाजिक पातळीवर तुमचा आदरही वाढेल.

कन्या

बुध ग्रह गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकते. बुध ग्रहाच्या गोचरमुळे तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही करिअरच्या क्षेत्रात मोठी उंची गाठू शकाल. जे लोक बऱ्याच काळापासून पदोन्नतीची वाट पाहत होते, त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. ???तुमच्याकडे पुरेसे पैसे असतील आणि तुम्ही पैसा, संपत्ती जमा करण्यातही यशस्वी होऊ शकाल. ??? कौटुंबिक जीवनात तुम्हाला मोठ्या भावाकडून किंवा बहिणीकडून लाभ मिळू शकतो.

तूळ

बुध ग्रहाचा गोचर तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येईल. या काळात तुम्हाला करिअर क्षेत्रात नवीन उंची गाठता येईल. तुमच्या कामातून तुमचे वरिष्ठ खूश होतील. तुमच्या अचूक कामातून लोकही प्रभावित होतील. तुम्ही कौटुंबिक कार्यक्रमातदेखील सहभागी होऊ शकता. जर तुम्ही संयुक्त कुटुंबात रहात असाल तर कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या कामगिरीमुळे कुटुंबात आनंद येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन

बुध ग्रह मीन राशीच्या लोकांचा लव्ह लाइफ आणि वैवाहिक संबंध सुधारू शकतो. या काळात सर्व तक्रारी दूर होतील आणि सुसंवाद प्रस्थापित होईल. जोडीदाराच्या आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. या राशीच्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. या काळात कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरीदेखील सुधारू शकते.