Budha Uday 2025 : बुद्धी आणि व्यवसायाचा कारक ग्रह म्हणून बुधाकडे पाहिले जाते. जो एका विशिष्ट कालावधीनंतर राशिबदल करतो, ज्याचा परिणाम १२ राशींवर दिसून येतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वादविवाद, शिक्षण, आदर, व्यवसाय, ज्ञान, बौद्धिक क्षमता इत्यादींचे कारक मानले जाते. बुध १५ दिवसांत राशिबदल करीत असतो. त्यात तो जून महिन्यातही दोनदा राशिबदल करेल. जूनमध्ये बुधाचा मिथुन राशीत उदय होईल. मिथुन राशीत बुधाच्या उदयामुळे काही राशींच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो.

वैदिक पंचांगानुसार, बुधाचा १८ मे २०२५ रोजी मेष राशीत अस्त झाला, आता ११ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांनी बुधाचा मिथुन राशीत उदय होणार आहे.

मेष

बुध ग्रहाच्या उदयामुळे मेष राशीच्या लोकांच्या जीवनात अनुकूल परिणाम दिसून येतील. भावा-बहिणींमधील दीर्घकाळापासून चालत आलेला दुरावा आता संपुष्टात येऊ शकतो. नाते अधिक घट्ट होईल. नवीन मित्र बनवता येतील. तसेच त्यांच्यासोबत तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकते; पण कोणत्याही प्रकारचा खर्च करण्यापूर्वी एकदा विचार करा. शिक्षण क्षेत्रातही चांगला परिणाम दिसून येईल. तुम्हाला बऱ्याच काळापासून असलेला एखाद्या गोष्टीबद्दलचा त्रास आता कमी होऊ शकतो.

सिंह

बुधाचा उदय सिंह राशीच्या लोकांना फलदायी ठरू शकतो. या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांत मोठा नफा मिळू शकतो. शिक्षण क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ते नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही अनुकूल ठरू शकते. तुम्ही करीत असलेल्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळू शकेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात. त्यामुळे तुमच्यावर काही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. आरोग्य चांगले राहणार आहे. त्याशिवाय उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत उघडू शकतात. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते. भविष्यासाठी तुम्ही पैसे बचत करून ठेवू शकता. प्रत्येक कामात यश मिळू शकते. त्याशिवाय मुलांकडून येणाऱ्या समस्याही संपतील. कौटुंबिक बाबींमध्येही तुम्हाला चांगले दिवस येतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वृश्चिक

बुधाच्या उदयामुळे वृश्चिक राशीच्या जीवनातही अनुकूल परिणाम दिसून येतील. अडकलेले पैसे मिळू शकतात आणि प्रलंबित कामे पुन्हा एकदा सुरू करता येऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचा कल अध्यात्माकडे असेल. अशा परिस्थितीत तुम्ही अनेक धार्मिक यात्रा करू शकता. व्यवसायाच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाले, तर तुम्ही तुमच्या स्पर्धकांशी उत्तमरीत्या तोंड देताना दिसू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि समाजात तुमचा आदर वाढेल.