Chanakya Niti : एक सामान्य मुलगा असलेल्या चंद्रगुप्ताला अखंड भारताचा सम्राट बनवणाऱ्या आचार्य चाणक्य यांची धोरणे वास्तविक जीवनात अतिशय फायदेशीर असल्याचे मानले जाते. या धोरणांचे पालन केल्यास व्यक्ती आपल्या कार्यात यश मिळवू शकते. ज्यांना विष्णुगुप्त व कौटिल्य म्हणूनही ओळखले जाते अशा आचार्य चाणक्यांनी आपल्या नीती ग्रंथात म्हणजे ‘चाणक्य नीती’मध्ये अशा चार कामांचा उल्लेख केला आहे; ज्यानंतर आपण स्नान केले पाहिजे. चला जाणून घेऊ त्याबद्दल सविस्तर….

”तैलाभ्यङ्गे चिताधूमे मैथुने क्षौरकर्मणि।

तावद् भवति चाण्डालो यावत् स्नानं न चाचरेत्।”

अंत्यसंस्कारांनंतर लगेच करावी अंघोळ

स्मशानभूमीत एकाच वेळी किंवा काही तासांच्या अंतराने अंत्यसंस्कार केले जातात. आचार्य चाणक्य सांगतात की, अंत्ययात्रेतून परत आल्यानंतर लगेच स्नान करावे. आंघोळ करूनच घरात जावे. कारण- स्मशानभूमीत अनेक प्रकारचे जंतू असतात; जे तुमचे नुकसान करू शकतात. त्यामुळेच अंत्यसंस्कारांनंतर लगेचच अंघोळ केली पाहिजे.

हेही वाचा – तुमची खोली अन् स्वयंपाकघरात वावरताना ‘या’ चुका टाळा अन्यथा देवी लक्ष्मी होईल नाराज! जाणून घ्या काय सांगते वास्तुशास्त्र

तेल मालिशनंतर त्वरित करावी अंघोळ

चाणक्‍यांच्या मते- जेव्हाही आपण आपल्या शरीराला मालिश करतो किंवा करवून घेतो, तेव्हा आपण अंघोळ केली पाहिजे. त्यामुळे आपल्या शरीरातील सर्व घाण साफ होते. तसेच ते म्हणतात की, कुठेही बाहेर जाण्यापूर्वी आंघोळ केली पाहिजे

लैंगिक संबंधानंतर स्त्री आणि पुरुष दोघांनीही करावी अंघोळ

चाणक्यांच्या मते- लैंगिक संबंधानंतर स्त्री आणि पुरुष दोघांनीही स्नान केले पाहिजे. आचार्य सांगतात की, लैंगिक संबंधानंतर शरीर अपवित्र होते, पवित्रता भंग होते. त्यानंतर हे जोडपे दुसरे कोणतेही काम करू शकत नाही. म्हणूनच लैंगिक संबंधानंतर त्वरित अंघोळ करावी.

हेही वाचा – Sun Transit 2023: सूर्यदेव करणार कर्क राशीत प्रवेश, जाणून घ्या १२ राशींवर कसा होईल प्रभाव?

केस कापल्यानंतर का करावी त्वरित अंघोळ?

चाणक्य सांगतात की, केस कापल्यानंतर त्वरित स्नान केले पाहिजे. कारण- केस कापल्यानंतर शरीरावर केसाचे छोटे छोटे तुकडे चिकटतात. त्यामुळे केस कापल्यानंतर लगेच अंघोळ करून शरीर स्वच्छ केले पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित असून लोकसत्ता याची पुष्टी करत नाही)