scorecardresearch

Premium

Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार आर्थिक लाभ, पाहा तुमचे भविष्य

Daily Horoscope In Marathi : राशीभविष्यानुसार वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.

Daily HHoroscope 9 october 2023
आजचे राशीभविष्य, ९ ऑक्टोबर २०२३ (Image Credit- Freepik)

दैनिक राशीभविष्य: 9 October 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

आपली चिडचिड इतरांना दाखवू नका. संयम बाळगून वागा. नकारात्मक घटना फार मनावर घेऊ नका. कटू गोष्टी अनुकूल करण्याची कला शिकून घ्या. प्रिय व्यक्तीच्या भेटीचा योग.

shani dev rise in kumbh rashi will show affect on these zodiac signs
Shani Dev : शनिचा लवकरच होतोय उदय ; या राशींच्या लोकांचे नशीब पालटणार? अमाप धनसंपत्तीसह मिळेल भरपूर यश
shani asta chal will be lucky for these zodiac signs
Shani Dev : २४ तासानंतर चार राशींचे नशीब पालटणार! शनिदेवाच्या कृपेने या लोकांना होणार अचानक धनलाभ
Venus And Sun Yuti
तब्बल १० वर्षांनी कुंभ राशीमध्ये शुक्र आणि सुर्य ग्रहाची होणार युती; ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळेल भरपूर पैसा
Shani Maharaj To Stay In Kumbh Rashi For A year Changing Life Money Health Mentality Aquarius Rashi Bhavishya Marathi Today
३६५ दिवस शनीचे वास्तव्य, कुंभ राशीत यंदा बदलणार वारे, स्वामी शनी महाराज तन, मन, धनलाभ कसे बदलतील?

वृषभ:-

धार्मिक ग्रंथांचे वाचन होईल. व्यवसायात नीतिचा मार्ग अवलंबा. आजचा दिवस समाधानकारक ठरेल. नवीन ओळखीतून प्रतिष्ठा लाभेल. अप्रिय व्यक्तींची भेट त्रासदायक ठरेल.

मिथुन:-

मित्र व नातेवाईकांशी सलोख्याने वागा. उगाच वाईटपणा घेऊ नका. मौल्यवान वस्तू जपाव्यात. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. जुनी कामे मार्गी लावाल.

कर्क:-

नवीन कामाकडे लक्ष ठेवा. जे मिळेल ते पदरात पाडून घ्या. सन्मानात वाढ होईल. मुलांच्या जबाबदार्‍या व्यवस्थित पार पाडाल. कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील.

सिंह:-

कौटुंबिक तिढा सोडवायला मदत कराल. मिळकतीचा नवीन स्त्रोत उत्पन्न होईल. एखाद्या कामासाठी अधिक धावपळ करावी लागेल. बोलण्यातून माधुर्य दर्शवाल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.

कन्या:-

जुन्या आजारांवर वेळीच लक्ष द्या. कोणतीही गोष्ट पुढे ढकलू नका. धनसंचयात वाढ होईल. व्यापारी क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित यश मिळेल. चांगल्या गोष्टीसाठी खर्च कराल.

तूळ:-

आनंदाची अनुभूति घ्याल. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. एखादा मोठा व्यवहार पार पडेल. घरातील लोकांचा आनंद द्विगुणित होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृश्चिक:-

वडिलोपार्जित धनाचा लाभ होईल. कोणत्याही संशयित कामात अडकू नका. पराक्रमात वाढ होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अधिक धावपळ झाल्याने आराम करण्यावर भर द्यावा.

धनू:-

जुन्या धार्मिक कथांचे श्रवण कराल. मन:शांती लाभेल. विरोधक माघार घेतील. एखाद्या व्यक्तीची भेट संस्मरणीय ठरेल. सासरच्या व्यक्तींकडून लाभ मिळेल.

मकर:-

दिवस आनंदात जाईल. जुनी सर्व कामे मार्गी लावाल. आर्थिक व्यवहारात यश येईल. जुने प्रयत्न फलद्रुप होतील. कार्यालयीन सदस्य कौतुक करतील.

कुंभ:-

मानसिक गुंतागुंतीत अडकू नका. विचारपूर्वक पाऊले उचला. निराशाजनक घटना दुर्लक्षित कराव्यात. अडचणीतून मार्ग निघेल. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका.

मीन:-

घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाईल. जुने परिचित लोक भेटतील. भावंडांना मदतीचा हात पुढे कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. प्रवासात सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Daily horoscope 9 october 2023 daily astrology rashi bhavishya in marathi tmb 01

First published on: 08-10-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×