• मेष:-
    कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी असेल. काही वेळेस समंजसपणा दाखवावा. आरोग्यात सुधारणा होईल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.
  • वृषभ:-
    आवडत्या गोष्टी करण्यावर लक्ष द्याल. दिवस मजेत घालवाल. आवडत्या छंदात मन रमेल. गृह-सौख्याकडे लक्ष द्यावे. मैत्रीचे संबंध दृढ होतील.
  • मिथुन:-
    मानसिक व्यग्रता जाणवेल. जुनी देणी चुकती करा. फार काळजी करण्याचे कारण नाही. पराक्रमाला वाव आहे. सारासार विचार करून कामे करावीत.
  • कर्क:-
    तिखट व तामसी पदार्थ खाणे टाळावेत आर्थिक स्थैर्य लाभेल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. मनातील आकांक्षा पूर्ण होतील.
  • सिंह:-
    कामात उतावळेपणा करू नका. ध्येय साध्य करण्याकडे लक्ष द्यावे. चटकन रागवू नका. धडाडीने कामे हाती घ्याल. मागचा पुढचा विचार करून कृती करावी.
  • कन्या:-
    गैर-समजुतीतून वाद वाढवू नका. डोळ्यांची तपासणी करावी. पायाच्या इजेकडे दुर्लक्ष करू नका. काही कामांत अधिक वेळ अडकून पडाल. प्रवासात सावधानता बाळगावी.
  • तूळ:-
    मनातील प्रबळ इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट घ्याल. सतत खटपट कराल. सर्वांशी जुळून घेण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक लाभावर लक्ष केंद्रित कराल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
  • वृश्चिक:-
    कामातील अनपेक्षित बदल समजून घ्यावेत. हातातील अधिकाराचा सुयोग्य वापर करावा. सेल्समन लोकांना फायदा संभवतो. हुकुमशाही वृत्ती बाजूस सारावी. जलदगतीने कामे कराल.
  • धनु:-
    कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्यावी. दुचाकी वाहन चालवताना सावधगिरी घ्यावी. उपासनेला अधिक बल मिळेल. स्व-कष्टावर अधिक लक्ष द्याल. नातेवाईकांचा ससेमिरा मागे लागेल.
  • मकर:-
    महिलांनी तब्येतीस जपावे. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. तब्येतीची वेळेवर तपासणी करून घ्यावी. उष्णतेचे विकार जाणवू शकतात. काटकसरीने वागावे.
  • कुंभ:-
    जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. काही वेळेस तारेवरची कसरत करावी लागेल. क्षुल्लक कारणांवरून रागवू नका. स्वभाव विरोध दर्शवू नका. वैवाहिक सौख्य जपावे.
  • मीन:-
    कापणे, भाजणे यांसारखे त्रास संभवतात. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे. अधिक चिकाटीने कामे कराल. पचनाची तक्रार जाणवू शकते. इतरांच्या वागण्याचा त्रास करून घेऊ नका.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर