Dhanteras Rajyog Zodiac Signs: वैदिक ज्योतिषानुसार यंदा धनत्रयोदशीचा सण १८ ऑक्टोबरला साजरा केला जाईल. या दिवशी बुध आणि सूर्य यांची युती होऊन बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग तूळ राशीत बनेल. त्यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात धनलाभ आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच तुम्हाला देश-विदेश प्रवासाची संधीही मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया, त्या कोणत्या राशी आहेत…

तूळ राशी (Libra Horoscope)

तुमच्यासाठी बुधादित्य राजयोग तयार होणे सकारात्मक ठरू शकते. कारण हा योग तुमच्या गोचर कुंडलीत पहिल्या स्थानावर बनणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात तेज आणि आत्मविश्वास वाढेल. तुमची काम करण्याची पद्धत सुधरेल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. बराच काळ अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. मेहनतीला यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. तसेच मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.

कर्क राशी (Cancer Horoscope)

बुधादित्य राजयोग तयार झाल्यामुळे कर्क राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीत भौतिक सुख आणि मालमत्तेच्या स्थानावर तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुखांची प्राप्ती होऊ शकते. तुम्ही पैशाची बचतही करू शकाल. या काळात करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे बढतीचे योग तयार होतील. व्यापारातही नफा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तसेच तुम्हाला पितृसंपत्तीचा लाभ मिळेल. आई आणि सासरच्या लोकांशी संबंधही चांगले राहतील.

मिथुन राशी (Capricorn Horoscope)

तुमच्यासाठी बुधादित्य राजयोग तयार होणे फायदेशीर ठरू शकते. कारण हा योग तुमच्या राशीनुसार करिअर आणि व्यवसायाच्या स्थानावर तयार होणार आहे. त्यामुळे या काळात बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते. अपूर्ण राहिलेले अनेक प्रकल्प या काळात सुरू होतील आणि त्यातून पुढे चांगला फायदा मिळू शकतो. कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करणाऱ्यांना नवीन नेतृत्वाची संधी मिळू शकते. या काळात परदेश प्रवास किंवा परदेशाशी संबंधित कामांमध्येही यश मिळू शकते. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात चांगला संवाद आणि समज वाढेल, त्यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. वडिलांशी संबंधही अधिक चांगले होतील. तसेच तुम्ही या काळात पैशाची बचत करू शकाल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)