आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक गोष्टींना घेऊन वेगवेगळ्या मान्यता आहेत. यामध्येच, ‘नजर लागणे’ ही गोष्ट आपल्याकडे खूप गांभीर्याने घेतली जाते. यापासून वाचण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. यातील एक गोष्ट म्हणजे पायामध्ये काळा धागा धारण करणे. काही लोक फक्त फॅशन म्हणून काळा धागा बांधतात. परंतु धर्म आणि ज्योतिष शास्त्रात या गोष्टीला खूप महत्त्व आहे. काळा धागा धारण केल्याने जीवन आनंदी आणि समृद्ध होते तसेच हे अनेक संकटांपासून आपला बचाव करते. जाणून घेऊया हातामध्ये किंवा पायामध्ये काळा धागा धारण का करावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नकारात्मक शक्ती राहते लांब :

  • ज्योतिषशास्त्रानुसार काळा धागा धारण केल्याने नकारात्मक शक्ती दूर राहते आणि व्यक्ती अनेक प्रकारच्या संकटांपासून वाचते. याशिवाय काळा धागा धारण करण्याचे अनेक फायदे आहेत.
  • काळा धागा नजरेच्या दोषांपासून संरक्षण करतो. ज्यांना वारंवार नजर लागते, त्यांनी काळा धागा जरूर घालावा.

हातावर ‘ही’ खूण असणाऱ्या व्यक्ती बनतात मोठे अधिकारी; मिळते नशिबाची साथ

  • कुंडलीत शनि ग्रह अशुभ स्थितीत असेल तर पायात काळा धागा धारण केल्याने खूप फायदा होऊ शकतो. यामुळे आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर शनीचा नकारात्मक प्रभाव टाळता येईल. अन्यथा शनीची वाईट नजर खूप नुकसान करते.
  • ज्या लोकांना आर्थिक नुकसान होत आहे किंवा व्यवसायात नुकसान होत आहे. अशा लोकांना पायात काळा धागा घातल्याने खूप फायदा होऊ शकतो.
  • जर कुंडलीत राहू-केतू कमजोर असतील तर पायात काळा धागा जरूर घालावा. हे तुम्हाला अनेक प्रकारच्या संकटांपासून वाचवते. राहू आणि केतू हे छाया ग्रह आहेत, त्यांचे अशुभ असणे जीवन उध्वस्त करू शकते.

असा धारण करावा काळा धागा :

  • शनिवारी काळा धागा धारण करा.
  • काळा धागा नेहमी भैरव मंदिरात नेल्यानंतरच धारण करावा. तसेच पायात काळा धागा धारण केल्यानंतर शनिदेवाच्या बीज मंत्राचा किमान २१ वेळा जप करावा.

‘या’ राशीचे लोक असतात आपल्या मर्जीचे मालक; ठरवलेली गोष्ट पूर्ण करूनच घेतात दम

  • काळ्या धाग्यासोबत कधीही लाल किंवा पिवळा धागा घालू नका.
  • काळा धागा धारण केल्यानंतर गायत्री मंत्राचा दररोज ११ वेळा जप करण्याचा प्रयत्न करा. यामुळे अधिक फायदा होईल.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know the benefits of wearing black thread on the feet learn the right way to wear pvp
First published on: 23-03-2022 at 10:27 IST