Dwi Dwadash Rajyog 2025 : देवांचा देव गुरू ग्रह दरवर्षी राशिबदल करीत असतो. एका राशीत पुन्हा येण्यासाठी सुमारे १२ वर्षे लागतात; पण या वर्षी गुरू दुप्पट वेगाने पुढे जाईल. या वर्षी गुरू मिथुन राशीसह कर्क राशीतूनही भ्रमण करील. यावेळी गुरू ग्रह मिथुन राशीत आहे. मिथुन राशीत राहून गुरू २४ मे रोजी बुधाशी संयोग करून द्विदशा योग निर्माण करेल. त्यामुळे काही राशीच्या लोकांना खूप फायदे मिळू शकतात. गुरु-बुध ग्रहाचा द्विद्वादश योग कोणत्या राशींसाठी भाग्यवान ठरू शकतो ते जाणून घेऊ…
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि गुरू हे ग्रह २४ मे रोजी दुपारी १२ वाजून ४४ वाजता एकमेकांपासून ३० अंशावर असतील, ज्यामुळे द्विद्वादश योग तयार होईल.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी गुरू- बुध ग्रहाचा द्विद्वादश योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीचे लोक आळस सोडून कामाकडे अधिक लक्ष देतील. भाऊ-बहिणींशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. व्यवसायात प्रगतीची शक्यता राहील. त्यामुळे वैवाहिक जीवनात फक्त आनंदच राहू शकतो. समाजात आदर आणि सन्मान वेगाने वाढू शकतो. तसेच उत्पन्नातही चांगली वाढ होऊ शकते. तुमचे तुमच्या वडिलांशी चांगले संबंध राहणार आहेत. तुम्ही कोणत्याही लग्नात किंवा कोणत्याही शुभ कार्यात भाग घेऊ शकता. तुम्ही धार्मिक यात्रा करू शकता.
मिथुन
द्विद्वादश योग मिथुन राशीच्या लोकांना फलदायी ठरू शकतो. या लोकांना मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. शिक्षण क्षेत्रात बरेच फायदे मिळू शकतात. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. समाजातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित लोकांशी तुमची चांगली भेट होऊ शकते. सामाजिकदृष्ट्या खूप प्रगती करता येते. त्यासह व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने असू शकते. अशा परिस्थितीत समस्या हळूहळू कमी होऊ शकतात. तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे.
धनू
गुरू व बुध ग्रहाचा द्विद्वादश योग धनू राशीच्या लोकांसाठी अनुकूल असू शकतो. या राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात आनंद असू शकतो. तुमच्या नात्यातील दुरावा आता संपुष्टात येऊ शकतो. जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल, तर या काळात तुम्हाला नफा मिळू शकतो. रिअल इस्टेटच्या बाबतीतही यश मिळू शकते. निर्णय घेण्याची क्षमता वाढू शकते. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे लक्ष दिले, तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.