Dwi Dwadash Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी-शुक्र ग्रहाला विशेष महत्त्व आहे. शनीला कर्मफळ दाता म्हटले जाते, तर शुक्र हा धन, समृद्धी, सन्मानाचा कारक मानले जाते. या दोन्ही ग्रहांच्या स्थितीत होणारा बदल निश्चितच १२ राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करत असतो. शनी सध्या मीन राशीत आहे, तर जून महिन्यात शुक्र मेष राशीत भ्रमण करेल. अशा परिस्थितीत शनी आणि शुक्र एकमेकांपासून ३० अंशांवर असतील, ज्यामुळे द्विद्वादश राजयोग तयार होत आहे. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना जून महिन्यात खूप फायदे मिळू शकतात.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून बाराव्या आणि दुसऱ्या घरात असतात किंवा ३० अंशांच्या अंतरावर असतात तेव्हा द्विद्वादश राजयोग तयार होतो.
मकर
मकर राशीच्या लोकांना शुक्र आणि शनीचा द्विद्वादश राजयोग अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात खूप फायदा होऊ शकतो. आदर आणि सन्मान वाढू शकतो. कुटुंबासह चांगला वेळ जाईल. आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. धार्मिक बाबींमध्ये आवड वाढू शकते. हुशारी आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही अनेक कामांमध्ये यशस्वी होऊ शकता. जोडीदारासह तुमचे नाते अधिक घट्ट होईल. तुम्ही ट्रिपचा प्लॅन करू शकता.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीचा द्विद्वादश राजयोग फलदायी ठरू शकतो. या राशीच्या लोकांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होऊ शकतात, यामुळे मुलांकडून येणाऱ्या समस्या सोडवता येऊ शकतात. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. व्यवसायाच्या क्षेत्रातही नफा मिळण्याची शक्यता आहे. जीवनात आनंद आणि शांती निर्माण होईल. पैशांची कमतरता दूर होईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्ही शिस्तबद्ध जीवन जगू शकता.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी द्विद्वादश राजयोग फलदायी ठरू शकतो. या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांत यश मिळू शकते. या राशीत शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. अशा परिस्थितीत, या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो. शिक्षण क्षेत्रातही लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळू शकेल. जर तुम्ही आयुष्यभर कोणत्याही कामावर कठोर परिश्रम करत असाल तर आता तुम्ही त्यात यशस्वी होऊ शकता.