रंगांचा सण म्हणून ओळखला जाणारा होळी हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तो उत्सव अगदी जवळ आला आहे. हिंदू धर्मात रंगांना विशेष महत्व आहे. शिवाय असं म्हटलं जातं की, माणसाच्या आयुष्यात रंगाचा जसा सकारात्मक प्रभाव असतो तसाच नकारात्मक प्रभावदेखील जाणवतो. होळी हा तर रंगाचा सण आहे. साहजिकच इतर सणाप्रमाणे या सणाचादेखील आपल्या राशींवर काही ना काही प्रभाव पडणार यात शंका नाही. तर होळीचा आपल्या राशींवर काय प्रभाव पडणार? याबाबत टॅरो कार्ड रीडर जीविका शर्मा यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार तुमच्या राशीवर यंदाच्या होळीचा काय परिणाम होऊ शकतो ते जाणून घेऊया.

हेही वाचा- ‘लक्ष्मी नारायण योग’ तयार झाल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो प्रचंड पैसा

मेष –

या होळीत सर्व काही तुमच्या बाजूने असेल असे नाही, परंतु काही गोष्टी तुम्हाला हव्या तशाच होण्याची शक्यता आहे. तर इतर काही गोष्टींना थोडा वेळ लागू शकतो. या सणासुदीच्या हंगामात तुम्हाला तुमच्या ओळखीच्या काही लोकांपासून दूर रहावे लागू शकते.

वृषभ –

या वर्षी, तुम्ही तुमच्या मित्रांसह किंवा कुटुंबासोबत होळी साजरी करण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या होळीला तुम्ही काही लोकांपासून थोडे अंतर ठेवून राहण्याची शक्यता आहे. तसेच तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

मिथुन –

हेही वाचा- १ मार्चपासून ‘या’ ३ राशी होणार गडगंज श्रीमंत? माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो भरपूर पैसा

या होळीमध्ये तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला प्रत्येक क्षणी साथ देतात हे लक्षात येईल, मग ती साथ वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक. या होळीदरम्यान, तुम्ही घेतलेला कोणताही निर्णय भविष्यात फलदायी ठरण्याची दाड शक्यता आहे.

कर्क –

कर्क राशींच्या लोकांसाठी यंदाची होळी आयुष्याला कलाटणी देणारी ठरू शकते. तसेच या काळात तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या खऱ्या हेतूंबद्दल जाणून घेऊ शकता.

सिंह –

२०२३ ची होळी तुम्हाला चांगल्या मार्गांनी पैसा देऊ शकते. होळीमुळे तुमचे प्रेमजीवन पुन्हा रुळावर येऊ शकते. मात्र, या काळात तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात खूप मेहनत करावी लागणार आहे.

कन्या –

तज्ञांच्या टॅरो कार्ड रीडिंगनुसार ही होळी तुमच्या आयुष्यात फारसे बदल घडवून आणणार नाही. परंतु भूतकाळातील कोणीतरी तुमच्या आयुष्यात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

तूळ –

हेही वाचा- मार्च महिन्याचे ३१ दिवस ‘या’ राशींसाठी लकी ठरणार? कुणाला धनलाभ तर कुणाला शनी.. जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

तूळ राशीतील लोक यंदाच्या होळीत आपल्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवू शकतात. तसंच तुम्हाला जे करायला आवडते ते तुम्हाला या काळात करता येऊ शकते. होळीचा दिवस शांततापुर्ण आणि सुखदायी असू शकतो.

वृश्चिक –

रंगांचा सण म्हणून ओळखली जाणारी हा होळीच्या सणाच्या काळात, तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनावर लक्ष केंद्रित करण्यात बराच वेळ घालवू शकता. एखाद्या प्रोजक्टवर तुम्ही खूप मेहनत कराल ज्याचे तुमच्या जीवनावरर चांगले परिणाम होतील आणि तुम्हाला आर्थिक लाभही होऊ शकतो.

धनु –

व्यावसायिक किंवा मैत्रीमधील चांगल्या गोष्टी पटकन पुर्ण होण्याची किंवा वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे. याचवेळी आर्थिकदृष्ट्या काही गोष्टी घडण्यास थोडा उशीर होण्याची शक्यता आहे.

मकर –

यंदाची होळी मकर राशीतील लोकांसाठी वैयक्तिक पातळीवर चांगली असणार आहे. तर या लोकांना व्यावसायिकदृष्ट्या खूप ताण येऊ शकतो. काही व्यवहार अडकू शकतात आणि काही अधिकृत कामेही अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.

कुंभ –

या राशीसाठी होळी चांगली राहील तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल राहू शकतो. व्यावसायिक जीवणात तुम्हाला हवे ते मिळू शकते आणि तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम करण्याची शक्यता आहे.

मीन –

मीन राशीच्या लोकांसाठी ही होळी व्यावसायिकदृष्ट्या उत्तम असण्याची शक्यता कमी आहे. मात्र, तुम्हाला मालमत्तेमुळे आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप- वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)