Ganpati Bappa Favourite Zodiac Signs: हिंदू धर्मात गणपती बाप्पाला प्रथम पूज्य मानले जाते. कोणतेही शुभ वा मंगल कार्य त्यांच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही. गणपती बाप्पाची नीटनेटकी पूजा केल्याने शुभ फळ मिळतं आणि अडकलेलं कामही सुरळीत होतं.

ज्योतिषशास्त्रानुसार १२ राशी काही ना काही देव-देवतांशी संबंधित असतात. त्यात काही अशा राशी आहेत ज्यांच्यावर गणपती बाप्पाची खास कृपा असते. गणपती बरोबरच त्यांच्या पत्नी रिद्धी-सिद्धीचाही आशीर्वाद या राशींवर राहतो.

या राशींना कधीच धन-दौलताची कमी पडत नाही आणि ते आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. चला, पाहूया कोणत्या राशी गणपती बाप्पाच्या आवडत्या आहेत…

मेष राशी (Aries Horoscope)

या राशीचा स्वामी ग्रह म्हणजे सेनापती मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांवर गणपती बाप्पाची खास कृपा असते. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळते. त्यांना कधीच पैशांची कमी जाणवत नाही आणि नेहमी सुख-समृद्धी मिळत राहते. करिअरपासून व्यवसायापर्यंत चांगला फायदा होतो.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. या ग्रहाचे अधिपती गणेशजी मानले जातात कारण ते बुद्धी आणि विवेकाचे देव आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांवर गणेशजींची खास कृपा राहते. या लोकांना चांगल्या प्रगतीसोबत धनलाभही होतो. गणेशजी प्रत्येक संकट दूर करण्यात मदत करतात आणि त्यांचे रक्षण करतात. समाजात मान-सन्मान वाढतो.

कन्या राशी (Virgo Horoscope)

या राशीचा स्वामी देखील बुध आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांवरही गणपतीची खास कृपा राहते. या लोकांना बाप्पा कधीच आर्थिक अडचण येऊ देत नाहीत. जीवनातील सगळ्या समस्या हळूहळू संपतात. प्रत्येक कामात यश मिळते आणि अनेक इच्छा पूर्ण होतात. आर्थिक स्थितीही चांगली राहते. शिक्षण क्षेत्रातसुद्धा मोठा फायदा होतो.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

या राशीच्या लोकांवरही गणपती बाप्पाची कृपा कायम राहते. या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. भूमिपुत्र मंगळामध्ये उत्साहाची निर्मिती एकदंतानेच केली होती. त्यामुळे या राशीच्या लोकांवर गणपती बाप्पाची खास कृपा असते. या लोकांचा स्वभाव थोडा आक्रमक असतो. अशा वेळी गणपतीच त्यांचा राग नियंत्रित करण्यात मदत करतात. या राशीच्या लोकांची अडकलेली कामे गणपती सोडवतात. विघ्नहर्ता त्यांचे सर्व दु:ख दूर करतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)