Guru Asta 2025Impact in Marathi: ज्योतिष्यशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतो. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रहाला ज्ञान, बुद्धी, धर्म, संपत्ती, अध्यात्म, शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये गोचर फार महत्त्वाचं समजलं जातं. ग्रहांच्या राशी परिवर्तनाला गोचर म्हणतात. सुख, संपत्ती, वैभव, ऐषाराम आणि ऐश्वर्याचा कारक असलेल्या गुरुचा राशी बदल अनेकार्थांनी महत्त्वाचा ठरतो. देवांचा गुरु असलेल्या गुरुला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे एक वर्ष लागते. या स्थितीत पुन्हा एका राशीत येण्यासाठी १२ वर्षे लागतात. अशा स्थितीत गुरु ग्रह अस्त आणि वक्री अवस्थेत जातो. गुरु सध्या मिथुन राशीत असून गुरु १२ जून रोजी मिथुन राशीत अस्त होईल. त्यामुळे, गुरु ग्रहाच्या अस्ताने काही राशींना नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता असून आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात, चला तर पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींंचे भाग्य चमकणार?

मिथुन

गुरूच्या अस्त होण्याने मिथुन राशीच्या लोकांचे सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात. या राशीच्या लोकांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही या काळात काही मोठा निर्णय घेऊ शकता. त्याचा भविष्यात भरपूर लाभ मिळू शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात. त्याचबरोबर परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते.

सिंह  

गुरूच्या अस्त होण्याचा अत्यंत शुभ परिणाम सिंह राशीच्या लोकांना मिळू शकतो. या राशीचे लोक करिअरमध्ये भाग्यवान ठरु शकतात. पदोन्नतीत विशेष लाभ मिळू शकतो. तुम्हाला परदेशात काम करण्याची संधीही मिळू शकते. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमची संपत्ती वाढू शकते.

कन्या

कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात गुरूच्या कृपेने सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवनात फायदा होऊ शकतो. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. अधिकाधिक पैसे कमवू शकाल. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे, लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)