Guru Nakshatra Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर राशीव्यतिरिक्त नक्षत्र बदल करतात, ज्याचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या होत असतो. यात देवांचा गुरु, गुरु ग्रह एका राशीत सुमारे एक वर्ष आणि एका नक्षत्रात सुमारे ३० दिवस राहतो. यामुळे गुरुला एका नक्षत्रात परत येण्यासाठी २७ महिने लागतात. यात आता गुरु लवकरच राहूच्या आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. आर्द्रा नक्षत्रात गुरुच्या प्रवेशाने १२ राशींपैकी तीन राशींना भरपूर लाभ मिळू शकतात. पण, नेमक्या कोणत्या राशींना याचा फायदा मिळेल जाणून घेऊ…
गुरु १४ जून रोजी पहाटे १२ वाजून ०७ मिनिटांनी आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. दोन महिने या नक्षत्रात राहिल्यानंतर गुरु १३ ऑगस्ट २०२५ रोजी आर्द्रा नक्षत्रातून पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करेल.
मेष (Aries)
गुरु आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करत असल्याने मेष राशीच्या लोकांना फायदा होईल. या काळात मेष राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात लाभ मिळू शकतो. जर या राशीचे लोक ट्रॅव्हलर किंवा फ्रिलान्सर असतील तर त्यांना लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. प्रत्येक कामात यश मिळू शकते. उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत उघडू शकतात. तसे तुम्ही पैसे वाचवण्यातही यशस्वी होऊ शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना पगार वाढ मिळू शकते. यासह प्रवासाद्वारे भरपूर पैसे कमवू शकतात.
वृषभ (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांना गुरुचा आर्द्रा नक्षत्रातील प्रवेश फलदायी ठरू शकतो. या काळात वृषभ राशीच्या लोकांना पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला फायदा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांमधील सुरू असलेल्या समस्या संपवू शकतात. तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. आयात-निर्यात, वित्त इत्यादी क्षेत्रात तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमचा धार्मिक कार्यात रस वाढू शकतो. धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता. या काळात थोडे जास्त पैसे खर्च करू शकता. गुरुमुळे तुम्हाला खूप आदर मिळू शकतो. तुमची अनेक कामे मार्गी लागण्यात यश मिळू शकते. तुम्हाला परदेश प्रवास करण्याची संधीदेखील मिळू शकते. शिक्षणाच्या क्षेत्रातही गुरु खूप मदतगार ठरू शकतात. याशिवाय लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यताही आहे.
तुळ (Libra)
गुरुचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश तुळ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. या काळात तुम्हाला पैसे कमविण्याचे अनेक नवीन स्रोत निर्माण होतील. देवाच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते. तुम्हाला गुरुच्या मार्गदर्शकांचे आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. मुलांकडून येणाऱ्या समस्या संपू शकतात. स्वभावात बरेच बदल दिसून येतील. तुम्ही राजकीय संबंध निर्माण करू शकता.