Jupiter Direct in Aries December 2023: ज्योतिषशास्त्रात, गुरु हा सुख, संपत्ती, वैभव, ऐश्वर्य, प्रेम आणि सुखसोयींचा कारक ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे स्थान असलेला गुरू सध्या मेष राशीमध्ये वक्री आहे. येत्या ३१ डिसेंबर २०२३ रोजी देवगुरु पुन्हा मार्गी होणार आहेत. अशातच जेव्हा गुरु आपली चाल चालतो तेव्हा त्याचा इतर राशींवर परिणाम दिसून येतो. त्यामुळे गुरुचे मार्गी होणे नवीन वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये काही राशींच्या लोकांसाठी खूपच फायदेशीर ठरु शकते. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींना मिळणार अपार धन?
कर्क राशी
कर्क राशींच्या लोकांसाठी गुरुचे मार्गी होणे खूपच फायदेशीर ठरु शकते. या राशीच्या लोकांना नवीन वर्षात नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना यश मिळू शकतो. सामाजिक कामात थोरामोठ्यांची साथ मिळू शकते. या राशीतील लोकांना आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग सापडू शकतात.
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात व रोजगारात मोठा लाभ मिळू शकतो. या राशीतील लोक नवीन वर्षात कार, घर किंवा फ्लॅट खरेदी करु शकतात. जुनी प्रलंबित कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. मोठ्या कंपनीत नोकरीची ऑफर मिळू शकते. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो.
(हे ही वाचा : पुढील वर्ष सुरु होताच ‘या’ ३ राशी होणार धनवान? लक्ष्मी-सूर्यदेव वर्षभर देऊ शकतात प्रचंड पैसा कमवण्याची संधी)
कन्या राशी
गुरु ग्रहाच्या प्रत्यक्ष हालचालीमुळे कन्या राशीच्या लोकांना नवीन वर्षात उत्तम संधी मिळू शकतात. तुमची कमाई वाढू शकते. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला ठरु शकतो. कुटुंबाकडून उत्तम सहकार्य मिळू शकतो. तसेत परदेशात शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.
धनु राशी
धनु राशींच्या लोकांसाठी गुरु मार्गी होणं अनुकूल ठरू शकतं. व्यवसायाशी संबंधित नवीन काम सुरू केल्यास काही दिवसांत चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात. या काळात तुमचं आर्थिक उत्पन्न वाढू शकतं. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढून तुमचा जोडीदाराशी संवाद वाढू शकतो.
(हे ही वाचा : आजपासून बुधदेव ‘या’ राशींना देणार अपार धन? बुधदेवाच्या गोचरामुळे २०२४ सुरु होण्याआधीच होऊ शकता श्रीमंत )
मीन राशी
देवगुरुच्या कृपेने २०२४ मध्ये मीन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळू शकते. वैवाहिक जीवनात आनंद राहू शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)