scorecardresearch

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार २० ऑगस्ट २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार वृषभ राशींचे व्यक्ती गोड बोलून सर्व कामे निभावून न्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील.

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार २० ऑगस्ट २०२२
आजचे राशीभविष्य २९ सप्टेंबर , (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 20 August 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

आज दिवसभर कार्यरत राहाल. बोलण्यात मधाळपणा बाळगावा. कामासंबंधी मनात संभ्रम बाळगू नका. गणपतीाची उपासना करा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव दिसून येईल.  

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

गोड बोलून सर्व कामे निभावून न्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील. चांगली पुस्तके वाचनात येतील. सहकार्‍यांची मदत घ्याल. चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्याल.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा. जोडीदारावर विश्वास ठेवावा. वरिष्ठांची मनधरणी करावी लागू शकते. नवीन योजनांची अंमलबजावणी करावी. मैत्रीतील सलोखा कायम ठेवावा.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक करा. समोरील व्यक्तीशी वाद टाळावा. अतिगोड पदार्थ खाणे टाळावे. दिवस अनुकूल जाईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

सिंह (Leo Horoscope Today ):-

बौद्धिक चातुर्य दर्शवाल. वरिष्ठांना विश्वासात घेऊन कार्य तडीस न्यावे. हलका आहार घ्यावा. आध्यात्मिक प्रगती करता येईल. विरोधकांचा त्रास कमी होईल.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

मित्रांची मदत होईल. मनात उगाच नसत्या शंका आणू नका. नातेवाईकांचा रूसवा काढावा लागेल. लहान-सहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. मनासारखे कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल.

तूळ (Libra Horoscope Today ):-

समाधानी दिवस असेल. नवीन कामात समाधानी राहाल. नातेवाईकांच्या गाठीभेटी घडतील. नवीन प्रकल्पावर काम चालू कराल. मौजमजेवर पैसे खर्च होतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

आळस झटकून कामाला लागावे. दीर्घ प्रतीक्षेच्या कामात यश येईल. आर्थिक पातळीवर समाधान मिळेल. समोरील संधीचे सोने करावे. कामानिमित्त घराबाहेर राहावे लागू शकते.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

हातून सेवा घडेल. घरगुती कामे जलद गतीने पार पडतील. जुन्या गोष्टीवर चर्चा टाळावी. पारंपरिक विचार बाजूला सारून पहावेत. नातेवाईकांना मदत करावी लागू शकते.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

दिवसभर कामात व्यग्र राहाल. घरातील जुन्या गोष्टीवर चर्चा करू नका. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. चिकाटीने व प्रामाणिकपणे कामे कराल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

काही गोष्टी अधिकार वाणीने सांगाव्यात. नवीन ओळखी सत्कारणी लागतील. भागीदारीत खुश असाल. नवीन विचारांना चालना द्यावी. मित्र जपून ठेवावेत.

मीन (Pisces Horoscope Today ):-

कौटुंबिक शांतता बाळगावी. बोलताना सौम्य शब्दांचा वापर करावा. व्यायामाचे फायदे लक्षात घ्या. व्यापारी वर्गाला अपेक्षित लाभ होईल. व्यवसाय वृद्धीचा विचार कराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope today 20 august 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr

ताज्या बातम्या