Dainik Horoscope : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.

Live Updates

Today's Horoscope  20 May 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह २० मे २०२५:

 

18:04 (IST) 20 May 2025

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope in Marathi)

सारासार विचाराला प्राधान्य द्यावे. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. लोकनींदेकडे दुर्लक्ष करावे. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. काटकसरीने वागावे लागेल.

17:55 (IST) 20 May 2025

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope in Marathi)

आततायीपणे कोणतेही काम करू नका. स्वभावातील हट्टीपणा कमी करावा. प्रकृतीची वेळेवर काळजी घ्यावी. पत्नीशी वाद वाढवू नये. अती शिस्त कामाची नाही.

17:26 (IST) 20 May 2025

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope in Marathi)

नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध वाढवा. जुन्या गोष्टींवर फार चर्चा नको. विचारपूर्वक खर्च करावा. शेअर्स मधून लाभ होईल. अचानक धनलाभाची शक्यता.

16:40 (IST) 20 May 2025

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope in Marathi)

जवळचा प्रवास सावधानतेने करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. इतरांना मनापासून मदत कराल. जोडीदाराविषयी गैरसमज संभवतात.

15:33 (IST) 20 May 2025

शनी जयंतीचा दुर्मिळ योग ठरणार गेमचेंजर! ७ दिवसांनी शनिदेव 'या' राशींना भरभरुन देणार? कुणाचं नशीब क्षणात पालटणार

Shani Jayanti 2025: शनि जयंतीला दुर्मिळ योगाची निर्मिती होणार असून त्यामुळे काही राशींच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. ...सविस्तर वाचा
15:32 (IST) 20 May 2025

मंगळ करणार मंगल; मंगळाचा सूर्याच्या राशीतील प्रवेश 'या' तीन राशींना देणार गडगंज श्रीमंतीचे सुख

Mars Gochar In Leo: सध्या मंगळ कर्क राशीत विराजमान असून जूनमध्ये सिंह राशीत प्रवेश करेल. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. ...अधिक वाचा
15:28 (IST) 20 May 2025

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope in Marathi)

जोडीदाराशी क्षुल्लक कारणामुळे मतभेद संभवतात. घाईघाईने निष्कर्ष काढू नका. कामात मन रमवावे. बुद्धीला अधिक चालना द्यावी लागेल. अपेक्षित व्यावसायिक लाभ होईल.

13:49 (IST) 20 May 2025

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope in Marathi)

चांगला व्यावसायिक लाभ होईल. दूरच्या प्रवासाचा योग संभवतो. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे. मेहनतीची कामे अंगावर येतील. काही कामना पुरेसा वेळ द्यावा.

12:46 (IST) 20 May 2025

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope in Marathi)

मानसिक चंचलतेवर मात करता येईल. अपचनाचा त्रास जाणवेल. कामे घाईघाईने उरकू नका. सहकार्‍यांकडून मदत घ्यावी लागेल. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे.

12:34 (IST) 20 May 2025

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope in Marathi)

इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. केलेल्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. तरुण वर्गाशी मैत्री कराल.

11:51 (IST) 20 May 2025

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope in Marathi)

कौटुंबिक स्थैर्‍याचा विचार करावा. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. जुनी इच्छा पूर्ण कराल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. तब्येतीची वेळेवर तपासणी करावी.

11:39 (IST) 20 May 2025

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope in Marathi)

मनातील नसत्या कल्पना काढून टाकाव्यात. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. गप्पांचा ओघ आवरता घ्यावा. जवळचा प्रवास सुखाचा होईल. झोपेचे तक्रार जाणवेल.

09:54 (IST) 20 May 2025

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope in Marathi)

कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. घरातील कामात मन रमून जाईल. बर्‍याच दिवसांनी नातेवाईकांची गाठ पडेल. कामातील बदल जाणून घ्यावेत. योग्य तांत्रिक माहिती मिळवावी.

09:01 (IST) 20 May 2025

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope in Marathi)

दिवस प्रसन्नतेत घालवाल. आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल. कुटुंबात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचे मित्र भेटतील.

08:25 (IST) 20 May 2025
५० वर्षानंतर केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण झाल्याने या राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! शुक्र ग्रहाची होईल असीम कृपा, अचानक होईल धनलाभ

Kendra Trikon Rajyog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करतात आणि शुभ आणि राजयोग निर्माण करतात, ज्याचा मानवी जीवनावर तसेच देश आणि जगावर परिणाम होतो. जूनमध्ये शुक्र स्वत:च्या वृषभ राशीत भ्रमण करेल, ज्यामुळे मालव्य आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होईल. या राजयोगाच्या निर्मितीसह, काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. संपत्तीतही प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच, अडकलेले पैसे परत मिळू शकतात. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत… सविस्तर वाचा

08:07 (IST) 20 May 2025

Daily horoscope: कालाष्टमीच्या मुहूर्तावर मेष ते मीनपैकी कोणाला होईल लाभ? कोणाची इच्छापूर्ती तर कोणाला लाभेल कौटुंबिक सुख

Rashi Bhavishya In Marathi, 20 May 2025 : २० मे २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी सकाळी ५ वाजून ५२ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर अष्टमी तिथी सुरु होईल. संध्याकाळी ७ वाजून ३२ मिनिटांपर्यंत धनिष्ठा नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४:३० वाजेपर्यंत असणार आहे. त्याचप्रमणे आज कालाष्टमी सुद्धा असणार आहे. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी व्रत साजरे केले जाते. या दिवशी काळभैरवाची पूजा करण्याची परंपरा आहे...सविस्तर वाचा

19:12 (IST) 19 May 2025

आता फक्त पैसाच पैसा! चंद्राने केला शनीच्या राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना पदोपदी मिळणार यश

Chandra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो. सविस्तर वाचा

19:11 (IST) 19 May 2025

पैसाच पैसा! सूर्याने सिंह राशीत प्रवेश करताच ५ राशींचे नशीब बदलणार! लक्ष्मी देईल दारी, यशाचा मार्ग मिळणार

Surya Gochar 2025 : सूर्य स्वराशि सिंहमध्ये प्रवेश करून काही राशींच्या लोकांचे आत्मबल, आत्मविश्वास आणि क्षमता वाढवतात. हे लोक योग्य दिशेने काम करता आणि जीवनात कायमस्वरूपी यशस्वी आणि सकारात्मक होऊ शकते. सविस्तर वाचा

Horoscope Today in Marathi Live 20 May 2025:

आजचे राशिभविष्य लाईव्ह २० मे २०२५ (सौजन्य - फ्रिपीक)

१२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.