Dainik Horoscope Highlight’s: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.

Live Updates

Today's Horoscope Highlight's 5 May 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह ५ मे २०२५:

17:09 (IST) 5 May 2025

Shani Gochar 2025: शनीच्या साडेसाती आणि ढैय्येपासून ५ राशींना मिळणार सुटका, करिअरमध्ये घेणार मोठी झेप, वर्षभर होईल पैशांचा पाऊस

Shani Ki Sadhe Sati and Dhaiya 2025 Impact : १२ राशींवर साडेसाती आणि ढैय्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव होत असतो पण पाच अशा राशी ज्यांच्या जीवनात साडेसाती आणि ढैय्याचा कोणताही अशुभ परिणाम होत नाही. ...सविस्तर वाचा
16:37 (IST) 5 May 2025

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)

हातात नवीन अधिकार येतील. तुमच्या कलेला प्रोत्साहन दिले जाईल. कोणाशीही उघड उघड शत्रुत्व पत्करू नका. आपले त्रासाला स्वत:च कारणीभूत होऊ नका. कामातील बदलांकडे लक्ष ठेवावे.

16:37 (IST) 5 May 2025

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)

स्वत:चेच म्हणणे खरे कराल. इतरांचे मत देखील विचारात घ्यावे. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. क्षुल्लक गोष्टींचा त्रागा करू नका. आपली छाप पडण्यात यशस्वी व्हाल.

15:17 (IST) 5 May 2025

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)

जोडीदाराचे वागणे दुराग्रही वाटू शकते. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. नवीन लोकांच्या ओळखी होतील. घरगुती प्रश्नांबाबत आग्रही भूमिका घ्याल. संयम सोडून चालणार नाही.

14:56 (IST) 5 May 2025

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)

योग्य संधीची वाट पहावी. काही कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. स्वभावात काहीसा चीड-चीडे पणा येईल. जोडीदाराविषयी गैरसमज करू नयेत.

14:16 (IST) 5 May 2025

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)

मानसिक व्यग्रता जाणवेल. सहकार्‍यांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे. नातेवाईकांना मदत करावी लागेल. वादातून मानसिक ताण वाढू शकतो.

13:11 (IST) 5 May 2025

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)

चारचौघात तुमची कला सादर करता येईल. सरकारी कामे मार्गी लागतील. मध्यस्थीच्या कामातून चांगला लाभ मिळेल. जोडीदाराची बाजू विचारात घ्यावी. क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका.

12:36 (IST) 5 May 2025

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)

मोठ्या लोकांची घरी ऊठबस वाढेल. योग्य मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. कामात स्त्रियांची मदत मिळेल.

12:29 (IST) 5 May 2025

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)

लपवाछपवी करू नका. फसवणुकीपासून सावध राहावे. मनातील नैराश्य काढून टाकावे. क्षणिक गोष्टींचा आनंद घ्याल. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे.

12:14 (IST) 5 May 2025

३० वर्षानंतर शनिदेवाची मार्गी चाल 'या' राशींना बनवणार मालामाल? पुढील २ महिन्यात शनिदेव देणार बक्कळ पैसा, नशीब पूर्ण पालटणार?

Shani Margi 2025: शनिदेव मार्गी होताच काही राशींचे सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात. जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत. ...वाचा सविस्तर
12:09 (IST) 5 May 2025

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)

काम आणि वेळ यांचे योग्य नियोजन करावे. सर्व बाबींचा अंदाज बांधावा लागेल. नवीन विचार अंमलात आणाल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. बदलांकडे वेगळ्या नजरेने पहावे.

12:02 (IST) 5 May 2025

आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)

घरात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. केलेल्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. कौटुंबिक खर्च वाढीस लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल

12:00 (IST) 5 May 2025
१६ मेपासून चमकणार या राशींचे नशीब, धनाचा दाता शुक्र करणार बुधच्या नक्षत्रात प्रवेश; उत्पन्न वाढणार, करिअरमध्ये प्रगतीचे योग

Shukra Gochar 2025: वैदिक ज्योतिषानुसार, ग्रह एका विशिष्ट अंतराने राशीने नक्षत्र बदलतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर तसेच देशावर दिसून येतो. तसेच, हा बदल एखाद्यासाठी भाग्यवान आहे. १६ मे २०२५ रोजी, संपत्तीचा दाता शुक्र रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. नक्षत्र गोचरच्या वेळी शुक्र मीनमध्ये उपस्थित असेल. मीन हा शुक्राचा उच्च राशी आहे. या कारणास्तव, मीनमध्ये असताना, शुक्र रेवती नक्षत्रात प्रवेश करून काही राशीच्या चिन्ह भवितव्य चमकू शकतो. त्याच वेळी, या राशी अचानक आर्थिक लाभाने भाग्यवान होत आहेत. तिथे तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या भाग्यवान राशी आहेत… सविस्तर वाचा

08:07 (IST) 5 May 2025

Ardhakendra Yog 2025: 'या' तीन राशींच्या घरी होईल लक्ष्मीचे आगमन, सूर्याच्या शक्तिशाली अर्धकेंद्र योगाने मिळेल अपार श्रीमंती

Surya Varun Ardhakendra Yog 2025: सूर्य मेष राशीमध्ये राहून या ६ मे रोजी वरूण ग्रहाबरोबर मिळून अर्धकेंद्र योग निर्माण करत आहे. या शक्तिशाली योगाचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येईल. हा राजयोग निर्माण झाल्याने काही राशींना मोठे लाभ मिळू शकतात. ...अधिक वाचा
07:54 (IST) 5 May 2025

Today's Horoscope: आश्लेषा नक्षत्रात 'या' राशींना मिळणार धनलाभासह जोडीदाराची साथ; तुमच्या आयुष्यात काय नवं घडणार? वाचा सोमवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya In Marathi, 5 may 2025 : ५ मे २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी सकाळी ७ वाजून ३६ मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर नवमी तिथी सुरु होईल. आश्लेषा नक्षत्र दुपारी २ वाजून १ मिनिटांपर्यंत जागृत असेल. वृद्धि योग रात्री १२ वाजून २० मिनिटांपर्यंत जुळून येईल. राहू काळ ७:३० वाजता सुरु होईल ते ९ पर्यंत असणार आहे. आज वैशाख शुद्ध अष्टमीला शंकर महाराजांची पुण्यतिथी म्हणजेच स्मरण दिन आहे. तर आठवड्याची सुरुवात तुमच्या राशीसाठी कशी असणार हे आपण जाणून घेऊया… सविस्तर वाचा

Horoscope Today in Marathi Live 5 May 2025

आजचे राशीभविष्य, ५ मे २०२५ लाईव्ह (सौजन्य - फ्रिपीक)

१२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.