Dainik Horoscope : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.
Today's Horoscope 8 July 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह ८ जुलै २०२५:
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)
स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. जवळच्या मित्र मंडळींमध्ये वेळ घालवाल. तुमच्या स्वभावातील गोडवा सर्वांच्या नजरेत येईल. दिवस मजेत जाईल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)
घरासाठी काही नवीन खरेदी केली जाईल. पैसे खर्च करताना मागचा-पुढचा विचार करावा. तिखट व तामसी पदार्थ खाल. आरोग्यात हळूहळू सुधारणा दिसून येईल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)
कामाच्या व्यापामुळे त्रासून जाऊ नका. भागीदारीत धोरण आधीच पक्के करावे. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. विचार करून साहस करावे.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)
अडचणींवर हसत-हसत मात करावी. केलेल्या कामातून समाधान मिळेल. देवाण-घेवाणीच्या कामात सतर्क राहावे. कौटुंबिक वातावरण शांततेचे राखावे. काहीतरी नवीन करून घरच्यांना खुश कराल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)
जीवनसाथी बरोबर दिवस मजेत घालवाल. प्रेमाचा सुंदर आविष्कार पहायला मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्या कोणाला घेऊ देऊ नका.
"अशा लोकांच्या घरी लक्ष्मी कधीही नांदत नाही", तुमच्या या सवयींमुळे घरात दारिद्र्य आणतात, वाचा काय सांगते चाणक्य नीति
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
सकारात्मक उर्जेने काम करावे. त्यासाठी तुम्हाला कमीत कमी वेळ द्यावा लागू शकतो. जवळच्या व्यक्तीकडून मदत घेता येईल. अधिकारी वर्गाची गाठ घेता येईल. तुमच्या मनातील इच्छेला मुरड घालू नका.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)
प्रलंबित थकबाकी प्राप्त होईल. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. मनातील निराशाजनक भाव काढून टाकावेत. लहान मुलांच्यात खेळावे. जेणेकरून मनावरील ताण कमी होईल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
समोरच्या व्यक्तिला गृहीत धरू नका. इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करावा. घरातील मोठ्या व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. एखादी जुनी आकांक्षा पूर्ण होईल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)
धाडसाने कामे हाती घ्याल. ठाम निर्णय घ्यावे लागतील. कामात द्विधावस्था आड येऊ देऊ नका. फसवणुकीपासून सावध राहा. अनावश्यक खर्चाला आळा. घाला.
गुरू 'या' तीन राशींना देणार पदोपदी यश; बुधाच्या राशीतील वक्री चालीने प्राप्त होणार पैसा अन् पद-प्रतिष्ठा
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
दिवस आनंदात जाईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रत्येक गोष्टीचा उत्तम रसास्वाद घ्याल. सर्व गोष्टींकडे आनंदी दृष्टीतून पहाल. गायन कलेला वेळ द्यावा.
१८ वर्षानंतर धोकादायक ग्रह योग! १३ जुलैपासून या राशींवर संकटाची चाहूल अन् धनहानी; आर्थिक नुकसानासह आरोग्य बिघडणार
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. बोलण्यात माधुर्य ठेवाल. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करू नका. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.
१२ महिन्यांनंतर लक्ष्मी नारायण योगाने ‘या’ राशींकडे येईल पैसाच पैसा! शुक्र बुधाच्या युतीने नोकरीत प्रमोशन, व्यवसायात नफा
Laxmi Narayan Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, शुक्र ग्रहाला वैभव, संपत्ती, भौतिक सुख, विलासी जीवन, लैंगिकता आणि वैवाहिक जीवनाचा कारक मानले जाते. तर बुध हा व्यवसाय, गणित, वाणी, अर्थव्यवस्थाचा कारक मानला जातो. यामुळे जेव्हा या दोन ग्रहांची युती होते तेव्हा त्याचा प्रभाव सर्व क्षेत्रांवर पडतो. यात ऑगस्टमध्ये शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. कर्क राशीत हा राजयोग जुळून येत आहे. ज्यामुळे काही राशींना अच्छे दिन सुरु होऊ शकतात. सविस्तर वाचा
Sun Transit 2025 : सूर्याचे कर्क राशीत गोचर, सिंह,तूळसह ५ राशींचे नशीब चमकणार, करिअरमध्ये मोठे यश मिळणार
१६ जुलै रोजी कर्क राशीत सूर्याचे गोचर होणार आहे. १६ जुलै रोजी संध्याकाळी ५:१७ वाजता सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल. सविस्तर वाचा
Dainik Rashi Bhavishya In Marathi, 8 July 2025: आज ८ जुलै २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी रात्री १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज रात्री १० वाजून १७ मिनिटांपर्यंत शुक्ल योग जुळून येईल. रात्री ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत ज्येष्ठा नक्षत्र जागृत असणार आहे. तसेच आज आज भौम प्रदोष व्रत करण्यात येणार आहे. मंगळवारी प्रदोष तिथी असेल, तर त्याला भौम प्रदोष म्हटले जाते. आज राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४:३० वाजेपर्यंत असणार आहे. तर मंगळवार तुमच्यासाठी कसा जाईल जाणून घेऊया
Horoscope Today: भौम प्रदोष व्रताच्या दिवशी महादेव कोणत्या रूपात करणार तुमचं भलं? वाचा मंगळवारचे १२ राशींचे राशिभविष्य
Dainik Rashi Bhavishya In Marathi, 8 July 2025: आज ८ जुलै २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी रात्री १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज रात्री १० वाजून १७ मिनिटांपर्यंत शुक्ल योग जुळून येईल. रात्री ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत ज्येष्ठा नक्षत्र जागृत असणार आहे. तसेच आज आज भौम प्रदोष व्रत करण्यात येणार आहे. मंगळवारी प्रदोष तिथी असेल, तर त्याला भौम प्रदोष म्हटले जाते. आज राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४:३० वाजेपर्यंत असणार आहे. तर मंगळवार तुमच्यासाठी कसा जाईल जाणून घेऊया
आजचे राशीभविष्य, ८ जुलै २०२५ (सौजन्य - फ्रिपीक)