शक्तीच्या उपासनेचा महान उत्सव नवरात्र चैत्र शुक्ल प्रतिपदा २२ मार्चपासून सुरु होत आहे. या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवातही होत आहे. तर यावेळी नवरात्रीत चार योगांचा विशेष योग होत आहे. ९ दिवसांच्या या नवरात्रीमध्ये देवीचे आगमन होडीवरून होईल आणि प्रस्थान पालखीतून होईल, जे अत्यंत शुभ मानले जाते.

शुक्ल व ब्रह्मयोगातील आद्य शैलपुत्रीच्या पूजेसह घटस्थापना करण्यात येणार आहे. ज्योतिषाचार्य पंडित कामेश्वर पांडे आणि सुनील कुमार दुबे यांनी नवरात्रीला होणाऱ्या विशेष महान योगाबद्दल सांगितले की, नवरात्रीला चार ग्रहांचे परिवर्तन होणार आहे. हा योगायोग तब्बल ११० वर्षांनंतर घडत आहे. तो योग नवीन वर्षावर होत असल्याने ते अधिक महत्त्वाचे मानले जात आहे.

हेही वाचा- पाच राजयोगांचा गुढीपाडवा! हिंदू नववर्षात ‘या’ राशींच्या नशिबाला मिळू शकते कलाटणी; तुम्हाला धनलाभ कधी?

हे असतील विशेष योग –

यावेळी नवरात्रीमध्ये चार सर्वार्थ सिद्धी, चार रवियोग, दोन अमृत सिद्धी योग, दोन राजयोग आणि द्विपुष्कर व गुरु पुष्य यांचा प्रत्येकी एक योग जुळून येणार असल्याचे ज्योतिषांनी सांगितले. नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे ३० मार्च रोजी रामनवमीला महागौरी पूजन आणि गुरु पुष्य योगाचा दुर्मिळ संयोग होणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रात क्रांतीची संधी –

हेही वाचा- ३१ मार्चला बुध- शुक्र- राहू येणार एकत्र; ‘या’ राशींना श्रीमंतीची संधी, ‘या’ रूपात कमावू शकता बक्कळ पैसे

या वर्षाचा राजा बुद्ध आणि मंत्री शुक्र असेल. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांतीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकते. महिलांच्या उन्नतीसाठीही यंदा विशेष संधी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसंच प्रतिपदा तिथी २१ मार्च रोजी ११ वाजून ४ मिनिटानी असेल. त्यामुळे २२ मार्चला सूर्योदयाबरोबरच नवरात्रीची सुरुवात कलश स्थापनेने होईल.

रामनवमी –

३० मार्चला महागौरीच्या पूजे बरोबर रामनवमी साजरी केली जाणार आहे. ३१ मार्च रोजी हा उत्सव साजरा होणार आहे. बुधवारपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. दुर्गा सप्तशतीनुसार बुधवारपासून मातेचे आगमन होडीतून होईल जे पीक, धन-धान्य आणि विकासासाठी लाभदायक मानले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)