Ketu nakshatra transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. दरम्यान आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते. यादिवशी महाराष्ट्रात मोठा उत्साह असतो. पंढरपुरात विठ्ठल भक्ताचा मेळा पाहिला मिळतो. यंदा आषाढी एकादशीला क्रूर केतू आपली स्थिती बदलणार आहे. आज एकादशी आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार केतू हा क्रूर आणि छाया ग्रह मानला गेला आहे. शास्त्रानुसार राहू आणि केतू ग्रह दीड वर्षातून एकदा आपली स्थिती बदलतात. पण या दीड वर्षात ते अनेक वेळा नक्षत्र बदल करतात. जुलै महिन्यातील एकादशी तिथीला केतू नक्षत्र बदल करणार आहे. केतूचं नक्षत्र बदल काही राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. आज पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात केतुचे भ्रमण होणार आहे. पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात केतुचा प्रवेश ३ राशीच्या लोकांना त्यांच्या आर्थिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरणार आहे.
केतूच्या नक्षत्र भ्रमणमुळे त्या तीन भाग्यशाली राशी कोणत्या आहेत. त्यांना कोणते कोणते फायदे मिळणार जाणून घ्या. यात तुमची रास आहे का पाहा.
वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी केतुचे नक्षत्र भ्रमण खूप भाग्यवान सिद्ध होणार आहे. अडकलेले पैसे परत तुम्हाला मिळणार आहे. तुमचे बँक बॅलन्स वाढणार आहे. करिअरसाठी हा काळ उत्तम असणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना यश प्राप्त होणार आहे.
सिंह – केतुच्या नक्षत्रातील बदलामुळे सिंह राशीच्या लोकांना मानसिक शांती प्राप्त होणार आहे. मालमत्ता किंवा कार खरेदी करू इच्छिणाऱ्या लोकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आत्मविश्वास द्विगुणीत वाढणार आहे. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे.
तूळ – केतुच्या नक्षत्रातील बदलामुळे तूळ राशीच्या लोकांना फायदाच फायदा होणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नफा प्राप्त होणार असून व्यवसायात विस्तारही होणार आहे. नवीन काम सुरू करणाऱ्यांसाठी हा शुभ दिवस असणरा आहे. पांडुरंगाच्या कृपेने तुम्हाला धार्मिक यात्रा घडणार आहेत. विष्णूची कृपा तुमच्यावर राहणार असून तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)