Hans Mahapurush Rajyog: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. शिवाय राशी परिवर्तनाच्या प्रभावाने अनेकदा एका ग्रहाची दुसऱ्या ग्रहाबरोबर युतीदेखील निर्माण होते. ज्योतिषशास्त्रात पंच महापुरूष राजयोगाचा उल्लेख केला जातो. ज्यामध्ये हंस, मालव्य, शश, भद्र आणि रूचक हे योग आहेत.
पंचागानुसार, ऑक्टोबरमध्ये गुरू आपली उच्च राशी असलेल्या कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. हा राजयोग १२ वर्षानंतर निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या व्यक्तींना त्याचा फायदा होईल.
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
मिथुन (Mithun Rashi)
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.
तूळ (Tula Rashi)
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा राजयोग खूप लाभदायक ठरेल. तुमच्या आयुष्यात अनेक सुखाचे क्षण येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा आणि कष्ट करण्यात मागे हटू नका.
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीच्या व्यक्तींसाठीही हा राजयोग खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)