Mars Retrograde Effects: ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या अत्यंत जवळ जातो आणि पृथ्वीवरून त्याची चमक दिसेनाशी होते, तेव्हा त्या ग्रहाला ‘अस्त’ झालेला मानले जाते. आता मंगळ ग्रह स्वतः १ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:३६ वाजता अस्त होणार आहे आणि तो पुन्हा २ मे २०२६ रोजी पहाटे ४:३० वाजता उदय होईल, म्हणजे तब्बल १८२ दिवस मंगळ अस्तावस्थेत राहणार आहे.
मंगळ हा ऊर्जा, धैर्य, उत्साह, भूमी, क्रोध आणि वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह मानला जातो, त्यामुळे त्याचा अस्तावस्था काळ सर्व राशींवर वेगवेगळा परिणाम करणारा आहे. मात्र, ज्योतिषांच्या मते या काळात तीन राशींनी विशेष सावध राहणं गरजेचं आहे, कारण या राशींसाठी हा काळ मानसिक ताण, अस्थिरता आणि गैरसमजांनी भरलेला ठरू शकतो.
१ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींवर संकटांचा पाऊस?
मेष
मेष राशीचे स्वामीच मंगळ असल्याने त्यांच्या अस्तामुळे मेष राशीवाल्यांसाठी हा काळ थोडा कठीण ठरू शकतो. या काळात चिडचिड, अधैर्य आणि राग वाढण्याची शक्यता असते. नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वादविवाद किंवा गैरसमज टाळावेत. जमीन-जुमल्याशी संबंधित निर्णय सध्या पुढे ढकललेले बरे. वाहन खरेदी-विक्री किंवा प्रवास करताना काळजी घ्या.
कर्क
मंगळ कर्क राशीत अस्त होणार असल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते. या काळात आत्मविश्वासात घट, मानसिक ताण आणि अस्थिरता जाणवू शकते. घरगुती वातावरण थोडं अस्वस्थ होऊ शकतं, विशेषतः वडीलधाऱ्यांसोबत मतभेद टाळावेत. नोकरीत ताण येऊ शकतो आणि कामात अडथळे जाणवू शकतात.
वृश्चिक
ही देखील मंगळ-स्वामित्वाची रास असल्याने, मंगळाचा अस्त या राशीवाल्यांसाठीही थोडा आव्हानात्मक ठरू शकतो. ऊर्जा कमी होणे, निर्णय घेण्यात गोंधळ आणि रागावर नियंत्रण न राहणे यांसारख्या समस्या संभवतात. जमिनीशी संबंधित व्यवहार किंवा गुंतवणूक करताना काळजी घ्या अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकतं. वैवाहिक नात्यातही ताण निर्माण होऊ शकतो.
एकंदरीत, १ नोव्हेंबरपासूनचा मंगळाचा अस्तकाळ धैर्य, संयम आणि शांततेने पार पाडणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या काळात घेतलेले निर्णय तुमच्या आयुष्यात मोठा फरक घडवू शकतात, त्यामुळे घाईगडबड न करता विचारपूर्वक पावलं उचलणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)