29 December Rashi bhavishya In Marathi : २९ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी पहाटे ४ वाजून २ मिनिटांपर्यंत राहील. ज्येष्ठ नक्षत्र रात्री ११ वाजून २२ मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज गंड योग रात्री ९ वाजून ४० मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ४ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजेपर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे आज शिवरात्रीचे व्रत पाळण्यात येणार असून, या दिवशी उपवास केल्याने भाविकांना भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते. तर आज महादेवाच्या कृपेने कोणाच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार हे आपण जाणून घेऊया..

२९ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- अवांछित खर्च सामोरे येऊ शकतात. बहु राष्ट्रीय कंपनीत काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल. डोळ्यांची काळजी घ्यावी. मनात नसत्या शंका आणू नका. मनाच्या चंचलतेला आवर घालावी.

वृषभ:- आज विविध स्तोत्रातून लाभ मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. भावंडांसोबत दिवस मजेत घालवाल. मित्रांमध्ये तुमची प्रशंसा केली जाईल. आवडीची खरेदी केली जाईल.

मिथुन:- कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पहायला मिळतील. दिवसभर कामाची धांदल राहील. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. आर्थिक गणित सोडवता येईल. वरिष्ठ नवीन जबाबदारी देऊ शकतात.

कर्क:- धार्मिक बाबीत रस घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मनातील समस्या दूर कराव्यात. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. धार्मिक स्थळाला भेट द्याल.

सिंह:- जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. पोटाचे विकार संभवतात. मनातील भलत्या चिंता बाजूला साराव्यात. अचानक लाभाची शक्यता. त्रासदायक गोष्टींपासून लांब राहावे.

कन्या:- जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवाल. संध्याकाळी एखादे सरप्राइज मिळेल. भागीदारीत चांगला नफा मिळेल. जनसंपर्कात वाढ होईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

हेही वाचा…Numerology Predictions Number 4: ‘या’ जन्मतारखा श्रम,बुद्धीच्या जोरावर मिळवणार यश; पण काही गोष्टींपासून ठेवा अंतर; ज्योतिषांनी सांगितली भविष्यवाणी

तूळ:- इतरांच्या बोलण्याचा मनावर परिणाम होऊ शकतो. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. उगाचच चिडचिड होऊ शकते. आत्मविश्वास सोडून चालणार नाही. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे.

वृश्चिक:- आजोळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. आपले छंद जोपासावेत. प्रेमातील लोकांना एकत्र वेळ घालवता येईल.

धनू:- कौटुंबिक जीवनात चांगले बदल होतील. घरातील ज्येष्ठांची सेवा करता येईल. अधिक वेळ घरगुती कामात घालवाल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण करता येईल. जवळचा प्रवास सुखाचा होईल.

मकर:- आपल्यातील सकारात्मक ऊर्जेचा वापर करावा. रखडलेली कामे तडीस नेता येतील. लहान भावंडांचा हातभार लागेल. प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल. अचानक जुने मित्र भेटतील.

कुंभ:- सांपत्तिक स्थिती सुधारेल. इतरांना बोलण्यातून जिंकू शकाल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. व्यापारी वर्ग खुश असेल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन:- आज लोक तुमच्यावर व्यक्तिमत्वावर आकर्षित होतील. विश्वासू मित्रांची साथ घ्यावी. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. लोकांवर तुमची चांगली छाप पडेल. प्रेमळपणे सर्वांच्या मनात घर कराल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर