Daily Astrology in Marathi :आज ११ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. एकादशी तिथी दुपारी १ वाजून १० मिनिटांपर्यंत राहील. तसेच बुधवारी वरियन योग संध्याकाळी ६ वाजून ४८ मिनिटांपर्यंत राहील. तर रेवती नक्षत्र दुपारी ११ वाजून ४८ मिनिटांपर्यंत राहील. तर बुधवारी राहू काळ दुपारी १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत राहील.

याशिवाय मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी ही मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. याच दिवशी गीता जयंती असते. गीता जयंतीचा उत्सव अगदी देशभर साजरा केला जातो. या दिवशी भगवद्गीतेचे पठण केले जाते. गीता जयंती म्हणजे तोच दिवस जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर भगवद्गीता सांगितली होती. त्या अर्थाने गीतेचा जन्म या दिवशी झाला, म्हणून त्या दिवसाला गीता जयंती म्हंटले जाते. तर आजचा शुभ दिवस योग कोणत्या राशीसाठी कसं सुखं घेऊन आला आहे हे जाणून घेऊया…

tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
balmaifal story for children
बालमैफल : मी… अनादी, अनंत!
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
The effect of the Sun's Mahadasha lasts for 6 years on a person
Surya Mahadasha: सूर्याच्या महादशेमुळे कोणत्या राशींचे नशीब चमकते करिअर अन् व्यवसाय? मिळते अपार धन-संपत्ती, ६ वर्षांसाठी राहतो प्रभाव
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
Shani and shukra made dhanadhya yoga
३० वर्षानंतर धनाढ्य योगामुळे ‘या’ राशींचे नशीब चमकणार! शनी आणि शुक्राची होईल असीम कृपा
2025 welcome gen beta generation loksatta
२०२५ : नव्या जागतिक पिढीचे आरंभवर्ष

११ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- मनाची चलबिचलता जाणवू शकते. लहान प्रवास चांगला होईल. भावंडांची उत्तम साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ:- आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. विचारांना अधिक चालना देऊन पहावे. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन:- उगाच कोणाच्या भरवश्यावर राहू नका. आवश्यक त्या गोष्टी समजावून घ्या. कार्यालयीन सहकार्‍यांची मदत मिळेल. नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल. व्यावसायिक गोष्टीत याचा उपयोग होईल.

कर्क:- जुन्या दुखण्यांना गांभीर्याने घ्या. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. भावनेला आवर घालावी लागेल. घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा. कामातील निर्णय योग्य ठरतील.

सिंह:- अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा. इतरांच्या मनीचे गुज जाणून घ्या. संमिश्र घटना घडू शकतात. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक वातावरणात रमाल.

कन्या:- काही गोष्टी नरमाईने घ्या. भडक मत दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. कामाची धांदल उडू शकते.

तूळ:- अहंकाराला खतपाणी घालू नका. बोलतांना इतरांच्या भावनेचा विचार करावा. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. मदतीला मागे हटु नका. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.

वृश्चिक:- क्रोधवृत्तीला आवर घालावी. अचानक धनलाभ संभवतो. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. मौल्यवान वस्तु जपून ठेवा. अति विचार करू नका.

धनू:- पराक्रमाला वाव आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते. तरूणांकडून नवीन विचार जाणून घ्याल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल.

मकर:- कामातून समाधान लाभेल. नातेवाईक भेटतील. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. वडीलांचे सहकार्य मिळेल.

कुंभ:- कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या खोडकरपणात रमून जाल. दिवस खेळीमेळीत जाईल.

मीन:- काहीशी मानसिक शांतता लाभेल. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका. घरगुती वातावरण हसते-खेळते राहील. जोडीदाराची चंगाली साथ मिळेल. भागीदारीत फार विसंबून राहू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader