Nitin Gadkari Astrology: रस्ते, महामार्ग आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी झटणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कमी शत्रू असलेल्या फार मोजक्या राजकारण्यांपैकी एक आहेत. नितीन गडकरी यांचं व्यक्तिमत्वच मुळात अजातशत्रू म्हणून ओळखलं जातं. आपल्या नंतर आपले राजकीय वारसदार आपलेच अपत्य असावे अशा पद्धतीच्या रांगा राजकारणात दिसू लागल्या आहेत. याही काळात राजकारणात मैत्री व मैत्रीत राजकारण न आणणारा एकमेव नेता म्हणून नितीन गडकरींची ओळख आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल अगदी तोंडावर असताना ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी गडकरींच्या राजकारणातील भविष्याविषयी व्यक्त केलेले अंदाज हे भाजपासाठी, विशेषतः मोदींसाठी व एकूणच देशासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. नितीन गडकरींचे मूलांक व भाग्यांक येत्या काळातील त्यांच्या कामगिरीविषयी काय सांगतात हे पाहूया..

लोकशाहीला सांभाळण्याची जबाबदारी गडकरींच्या हाती?

बुध मंगळ त्रिएकादश योगातून तयार होणारा राजयोग पुढील काळातही उत्तम नेतृत्व निर्माण करेल. तसेच अडचणीच्या काळात आपल्या चतुरस्त्र डावांनी देशातील लोकशाहीला सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारून होणारा विरोध संपवून टाकेल. आश्वासने नकोत, पूर्तता करू हा त्यांचा कानमंत्र ठरेल. राजकीय आयुष्यात पुरेसे पर्याय असावेत. आंधळेपणाने केलेलं देशाचं राजकारण विनाशाकडे नेईल याची पुरेपूर जाणीव असणारी ही व्यक्ती भावी काळातील नेतृत्व घडवेल. जुलै २०२४ पर्यंत अष्टमेश चतुर्थात व गुरु षष्ठात, लग्नात शुक्र असल्याने तब्येतीची काळजी घ्यावी. श्रम करणे टाळावे. मानसिक स्वास्थ्य जपावे. २ मार्च २०२६ पर्यंत बुधाची अंतर्दशा व २०३५ पर्यंत कायम गुरु महादशा आपल्याला राजकीय क्षेत्रात बहुमानाचे पद प्राप्त करून देईल.

हे ही वाचा<< “उद्धव ठाकरेंचा घात करू शकतात ‘ही’ माणसं, जून २०२४ मध्ये..”, ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी, लवकरच..

यापूर्वी ज्योतिषतज्ज्ञ उदयराज साने यांनी सुद्धा नितीन गडकरी यांच्या कुंडलीवरून काही अंदाज वर्तवले होते. यानुसार, त्यांच्या कुंडलीत येणारा राहू हा राशीला बारावा येत असल्याने व त्यांच्या कुंडलीतील मूळच्या राहुला सहावा येत असल्याने संमिश्र फलदायी होणार आहे ह्या गोचर राहू मूळे त्यांची राजकीय महत्वकांक्षा सफल होणार नाही. २०२४ मध्ये प्रकृतीचे वाढते त्रास त्यांना सहन करावे लागणार आहेत. दोन्ही तज्ज्ञांच्या मताचा विचार केल्यास बहुधा २०२४ हे वर्ष जरी गडकरींसाठी थोडे कठीण असले तरी पुढील काळात त्यांना मान प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मोदींना कशी होईल गडकरींची मदत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जन्मतारीख १७ सप्टेंबर १९५० (१७- ०९- १९५०), या अंकांची बेरीज केल्यास १+७+९+१+९+५+०= ३२, ३+२= ५ मोदींचा भाग्यांक व मूलांक आपल्या समोर येतो. मोदींच्या जन्मतारखेनुसार त्यांचा मूलांक आहे १+ ७= ८ आणि भाग्यांक आहे ५. आता नितीन गडकरी यांची जन्मतारीख. २७- ५- १९५७. यानुसार मूलांक येतो २+ ७= ९ व भाग्यांक येतो २+ ७+५+१+९+५+७= ३५, ३ +५= ९. एकूण दोन्ही जन्मतारखांचे बलाबल आपापल्या परीने योग्य असले तरी गडकरींच्या जन्मतारखेत ९ हा अंक खूपच बलवान ठरतो. मोदींच्या जन्मतारखेच्या (१+७= ८) ८ या मूलांकावर शनीचे वर्चस्व असते. शनीचे राजकारण हे हट्टीपणाचे व आततायीपणाचे असते अशा प्रभावाखाली घेतलेले निर्णय हे वादग्रस्त ठरू शकतात. अशावेळी नितीन गडकरींचा पाठिंबा मोदींना फायद्याचा ठरू शकेल.