Lakshmi Narayan Rajyog: ग्रहांचे राजकुमार, बुद्धी व धनदाता बुध ग्रहाचे राशी परिवर्तन हे १२ राशींच्या आयुष्यात मोठी उलथापालथ करत असते. शनी, मंगळ या ग्रहांच्या तुलनेत बुधाचा प्रभाव सौम्य असतो असे अनेकांना वाटू शकते मात्र बुध ग्रहाच्या गोचराने सुद्धा राजाचा रंक होऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा बुधाचा प्रभाव हा एखाद्या अन्य ग्रहासह जोडला जातो तेव्हा त्यातून तयार होणारे राजयोग हे खूप शक्तिशाली असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येत्या ३१ मेला बुध ग्रह दुपारी १२ वाजून २ मणितांनी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत अगोदरच शुक्र विराजमान आहेत. बुध व शुक्राच्या युतीने या महिन्याच्या अखेरीस अत्यंत दुर्मिळ असा लक्ष्मी नारायण राजयोग साकारला जाणार आहे.

शुक्र कोणत्याही राशीत किमान एक महिना वास्तव्याला असतो त्यामुळे त्याच राशीत पुन्हा येण्यासाठी त्याला तब्बल १ वर्ष तरी लागतेच. त्यामुळे यावेळी बनणारा राजयोग हा आणखीनच दुर्लभ असा आहे. लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने मेष, कन्यासहित काही राशींना बक्कळ धनलाभ होणार आहे. पाहूया त्यांचे राशीभविष्य..

लक्ष्मी नारायण राजयोगाने ‘या’ तीन राशींचे दिवस पालटणार

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष राशीच्या मंडळींना लक्ष्मी नारायण राजयोग हा लाभदायक सिद्ध होऊ शकतो. कित्येक वर्षांपासून अडकून पडलेली कामे पूर्ण होतील. मान सन्मान वाढीस लागेल. कामाच्या पूर्ततेसह धनलाभाची दारे सुद्धा उघडतील. घरात एखादे मंगलकार्य जुळून येईल. नोकरदार मंडळींची मेहनत व कष्टाचे चीज होईल. वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा होईल व त्याचा प्रभाव पदोन्नती, पगारवाढ अशा रूपात तुम्हाला दिसून येईल. नोकरीच्या नव्या संधी सुद्धा चालून येतील. एखादी नवी गोष्ट शिकायची असल्यास तुम्हाला बुद्धीची साथ मिळेल पण मेहनतीला पर्याय नाही. या कालावधीत आत्मविश्वास सुद्धा वाढेल.

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

कन्या राशीच्या मंडळींसाठी लक्ष्मी नारायण राजयोग हा सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. या राशीच्या मंडळींना नशिबाची पुरेपूर साथ लाभू शकते. नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांना उत्तम संधी प्राप्त होतील. वेतनात वाढ होऊ शकते. आर्थिक स्थिती सुधारल्याने हौस जपू शकता. भविष्यासाठी बचत करण्याची संधी मिळू शकते. आपल्याला जोडीदारासह उत्तम वेळ घालवता येईल. कौटुंबिक एकोपा वाढेल. आयुष्यातील नवा आनंद पाहून मानसिक तणाव दूर होईल परिणामी तुमच्या आरोग्यातही सुधारणा होऊ शकते.

हे ही वाचा<< २४ मे पंचांग: अचानक धनलाभ व साहसी निर्णय, मेष ते मीन राशीत शिव व सिद्ध योगामुळे आज मोठे बदल; वाचा शुक्रवारचं भविष्य

मीन रास (Pisces Rashi Bhavishya)

मीन राशीच्या मंडळींना लक्ष्मी नारायण राजयोगाने आजवर न अनुभवलेली गती अनुभवता येणार आहे. आपल्याला करिअरमध्ये सर्वाधिक फायदा होऊ शकतो. वरिष्ठांचे मार्गदर्शन व सहकार्य मोलाचे ठरेल. आपले लक्ष्य प्राप्त कराल. नोकरीच्या ठिकाणी वाद सुद्धा होण्याची शक्यता असते. आर्थिक स्थितीविषयी सांगायचे तर जुन्या कर्माचे फळ आपल्या नशिबात लिहिले आहे. आधी केलेली गुंतवणूक किंवा कामाचे परतावे या माध्यमातून आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)