21st September Rashi Bhavishya & Panchang : आज २१ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी संध्याकाळी ६ वाजून १४ मिनिटांपर्यंत राहील. तर रात्री ११ वाजून पर्यंत व्याघात योग जुळून येईल, त्यानंतर हर्ष योग सुरु होईल. याशिवाय भरणी नक्षत्र १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. राहू काळ पहाटे ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे.

तसेच चतुर्थी तिथी असलेल्यांचे श्राद्ध सुद्धा आज केले जाईल. याशिवाय आज संकष्टी चतुर्थी सुद्धा असणार आहे. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त उपवास करतात. त्यांच्या आवडीनुसार घरात, मंदिरात जाऊन पूजा करतात आणि नैवैद्य म्हणून मोदक सुद्धा अर्पण करतात. तर आज मेष ते मीन राशींना बाप्पा कसा आशीर्वाद देणार हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या…

२१ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य :

मेष:- आपल्या मर्जीने दिवस घालवाल. दरवेळेस घाई उपयोगाची नाही. अती उत्साह दाखवू नका. निश्चयाने कामे हाती घ्या. कौटुंबिक गोष्टीत अधिक वेळ रमाल.

वृषभ:- आपल्या वर्तनावर कोणी संशय घेणार नाही याची काळजी घ्या. सावध भूमिका घ्या. वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन घ्या. कौटुंबिक खर्च चिंतेत टाकू शकतो. मनाची चंचलता जाणवेल.

मिथुन:- मित्रांचे सल्ले तपासून घ्या. डोळे झाकून निर्णय घेऊ नका. नवीन कार्यात जोडीदाराचा सल्ला घ्यावा. कठोर मेहनतीला पर्याय नाही. कौटुंबिक सौख्यासाठी खर्च कराल.

कर्क:- आपली चूक मान्य करायला शिका. निष्काळजीपणा कमी करावा. जुन्या मित्रांची गाठ घ्याल. शेजार्‍यांची मदत मिळेल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील.

सिंह:- जोडीदाराच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. दिवस आनंदात जाईल. मित्रांसोबत फिरायला जाल. मुलांसोबत चांगला काळ व्यतीत कराल. कार्यालयातील कामे सकारात्मक परिणाम देतील.

कन्या:- लोकांशी बोलताना विचार पक्के ठेवा. आपले मुद्दे ठामपणे मांडा. आजचा दिवस मध्यम फलदायी. काही घटनांमुळे ताण वाढू शकतो. अस्थिरतेमुळे मन विचलीत होऊ शकते.

तूळ:- बाहेरचे खाणे टाळावे. उगाच आजारांना निमंत्रण देऊ नका. मित्रांना मदत कराल. अपेक्षित यशासाठी मेहनत घ्यावी लागेल. बोलताना तारतम्य बाळगवे.

वृश्चिक:- लोकांना बोलण्यातून दिलासा द्यावा. कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात वेळ जाईल. कर्ज मुक्तीसाठी प्रयत्न कराल. प्रेमातील व्यक्तींना नवीन ऊर्जा मिळेल.

धनू:- कामाचा उरक वाढवावा. मुलांकडून लाभ होतील. संमिश्र घटनांचा दिवस. परोपकाराची जाणीव ठेवाल. घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. वाहन खरेदी बाबत चर्चा कराल.

मकर:- तुमचा निर्णय समोरची व्यक्ती मान्य करेल. घरातील कामात गुंग राहाल. मानसिक शांतता लाभेल. कौटुंबिक कामे प्राधान्याने पूर्ण कराल. मित्रांच्या मदतीने महत्त्वाची कामे पार पाडाल.

कुंभ:- रोजच्या गोष्टी संभ्रमात पाडू शकतात. कार्यालयीन वातावरण चांगले राहील. उत्साहाने कार्यरत राहाल. धार्मिक गोष्टीत आनंद मिळेल. अधिकार्‍यांच्या सहकार्याने समस्या दूर होईल.

मीन:- व्यवसायात चलती झालेली दिसून येईल. आहाराची पथ्ये पाळावीत. कौटुंबिक कामात हिरीरीने भाग घ्याल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. दिवसाची सुरुवात कंटाळवाणी असू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर