Shani Guru Shatank Yog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा अत्यंत शक्तिशाली आणि क्रूर ग्रह मानला जातो. शनि हा असा एकमेव ग्रह आहे ज्याला साडेसातीचा हक्क आहे. सर्वात हळूवार चालणार्‍या या ग्रहाला एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्ष लागतात. अशात या दरम्यान हा ग्रह कोणत्या ना कोणत्या इतर ग्रहाबरोबर युती निर्माण करतो.

शनि सध्या मीन राशीमध्ये विराजमान आहे. जुलै महिन्याच्या शेवटी गुरूबरोबर संयोग करून शतांक योग निर्माण करणार आहे. हा राजयोग निर्माण झाल्याने काही राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. तसेच पद प्रतिष्ठा प्राप्ती होऊ शकते. ३१ जुलै रोजी रात्री १० वाजून ९ मिनिटांनी गुरू आणि शनि एकमेकांपासून १०० डिग्रीवर असणार. ज्यामुळे सेनटाइल म्हणजेच शतांक योग निर्माण होईल. हा योग निर्माण झाल्याने काही राशींना फायदा होणार आहे.

वृषभ राशी (Taurus Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा शतांक योग अत्यंक लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या लोकांचे दीर्घ काळापासून अडकलेले कार्य पूर्ण होऊ शकतात. शनि वक्री होत असल्याने या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. गुरू हा धन भाव मध्ये विराजमान होत असल्याने आकस्मिक धन लाभ मिळू शकतो. तसेच या लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवाल. प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल. लव्ह लाइफमधील अडचणी दूर होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. या लोकांचा समाजात मान सन्मान वाढेल.

मकर राशी (Capricorn Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी शनि गुरूचा शतांक योग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. दीर्घ काळापासून अडकलेले कामे पूर्ण होऊ शकतात. जीवनात येणार्‍या अडचणी दूर होऊ शकतात. तसेच आरोग्य उत्तम राहीन. व्यावसायिक क्षेत्रात लाभ मिळेल. या लोकांना चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो.

कन्या राशी (Virgo Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी शनि वक्री आणि गुरूचा शतांक योग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. विद्यार्थ्यांना आणखी मेहनत घ्यावी लागेल, तेव्हाच त्यांना यश मिळू शकते. नात्यात एक नवीन उष्णता, नवीन ऊर्जा दिसून येईल. अविवाहित लोकांना लग्नाचे योग जुळून येईल. व्यवसायात या लोकांना फायदा मिळेल. या लोकांना यांच्या कष्टायचे फळ मिळेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे